• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात शनिवारी व रविवारी रंगणार किड्स फेस्टिव्हल

ByMirror

Dec 14, 2022

नन्हा ज्ञान फाऊंडेशन (पुणे) व द आयकॉन पब्लिक स्कूलचा संयुक्त उपक्रम

लहान मुलांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- लहान मुलांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी नन्हा ज्ञान फाऊंडेशन (पुणे) व द आयकॉन पब्लिक स्कूल यांच्या वतीने 17 व 18 डिसेंबर रोजी किड्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे स्टेशन रोड येथील आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये रंगणार्‍या या सोहळ्यात शहरातील 22 शाळांचे चारशेहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहे.


या दोन दिवसीय किड्स फेस्टिव्हलमध्ये एज्युकेशन फेअर व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या किड्स फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन असून, आकाश आणि बायजू हे सहयोगी भागीदार आहेत.


दोन दिवसीय कार्यक्रमात वक्तृत्व, चित्रकला, शास्त्रीय नृत्य, कविता वाचन, कथाकथन, फॅन्सी ड्रेस आणि इतर विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, मनोरंजनात्मक खेळ, विविध स्टॉल्सचा समावेश राहणार आहे. विद्यार्थ्यांना मनोरंजनाबरोबर कला-गुणांचा विकास साधून या कार्यक्रमाचा आनंद लुटता येणार आहे.


दुसर्‍या दिवशी समारोपीय कार्यक्रमात विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात येणार आहे. तर शिक्षण क्षेत्रात निस्वार्थ भावनेने उल्लेखनीय योगदान देणार्‍यांना अठराव्या हीलिंग लाइट अवॉडर्सने सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये मानसिक प्रशिक्षक, पालक प्रशिक्षक, एड्युरफॉर्मर्स, क्रीडा प्रशिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *