• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

कोरोना काळात दिलेल्या निस्वार्थ योगदानाबद्दल अल्ताफ सय्यद यांना पुरस्कार

ByMirror

Dec 7, 2022

टाळेबंदीत गरजूंना आधार देऊन, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राबविले होते विविध उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या टाळेबंदी काळात निस्वार्थ भावनेने गरजूंना अन्न-धान्यासह किराणा किटचे वाटप करुन, विविध उपक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय अधिकारी व प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ सय्यद यांना कोरोना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आले.


क्लेराब्रुसच्या मैदानात झालेल्या गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात सिने अभिनेते राजेश ननवरे व अभिनेत्री कीर्ती पवार यांच्या हस्ते सय्यद यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नाजिमभाई कुरेशी यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी इरफान कुरेशी, आजिम कुरेशी, नदिम शेख, मुजीर सय्यद, आयान सय्यद, गुड्डू शेख, फैजान शेख, अक्षय शिरसाठ, कैसर मेंबर, मोहम्मद अली, अवेज कुरेशी, जमिर शेख, बजरंग पैलवान आदी उपस्थित होते.


अल्ताफ सय्यद यांनी शरद पवार विचार मंचच्या माध्यमातून टाळेबंदी काळात सुमारे चार ते पाच हजार सर्वसामान्य गरजू, निराधार तसेच परप्रांतीय मजूरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. सण व उत्सवकाळात गरजूंना मदतीचा हात दिला. तसेच पोलीस प्रशासनाला त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतूने मास्क, सॅनिटायझर, च्यवनप्राश आदी वस्तूंचे वाटप केले. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी अहमदनगर तहसील कार्यालय, वाहतूक शाखा तसेच तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी सॅनिटायझर टनेलची (कक्ष) उभारणी केली होती.

रिक्षा चालकांना पारदर्शक संरक्षक शीटचे वाटप केले. तसेच बुथ हॉस्पिटलला अत्यावश्यक गरजेच्या वस्तू पुरविल्या. हे सामाजिक कार्य त्यांनी निस्वार्थ भावनेने शहर व ग्रामीण भागात राबविले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले. सय्यद यांनी कोरोनाच्या संकटकाळात दिलेले योगदान कौतुकास्पद असून, त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याची भावना नाजिम कुरेशी यांनी व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *