• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

मार्कंडेय विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक रामदिन यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

ByMirror

Dec 2, 2022

समाज घडविणारा शिक्षक कधीच निवृत्त होत नाही -गिरीश कुलकर्णी

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज घडविणारा शिक्षक कधीच समाजातून निवृत्त होत नाही. तो कायम समाजाला दिशा देत राहतो. निवृत्ती फक्त नोकरीची असते, मात्र त्यांची सामाजिक तळमळ कायम राहत असल्याचे प्रतिपादन स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी यांनी केले.


गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक रामदिन यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त कुलकर्णी बोलत होते. पद्मशाली विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक भूषण देशमुख, संस्थेचे ज्येष्ठ विश्‍वस्त शरद क्यादर, उपाध्यक्ष विलास पेद्राम, सचिव डॉ. रत्नाताई बल्लाळ, विश्‍वस्त राजू म्याना, महेंद्र बिज्जा, जितेंद्र वल्लाकट्टी, माजी प्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल, रावसाहेब क्षेत्रे, माजी शिक्षक वीरभद्र बत्तीन, गणपत सानप आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


पुढे कुलकर्णी म्हणाले की, रामदीन सरांनी शाळेत श्रमिक कष्टकर्यांची मुले घडवली आहेत. तर सामाजिक चळवळीतही योगदान दिलेला आहे. सेवानिवृत्तीनंतर ते सामाजिक कार्यात सदैव कार्यरत राहणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


सेवापूर्तीनिमित्त मुख्याध्यापक दीपक चंद्रकांत रामदिन व सुवर्णा रामदिन यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात प्रा. भानुदास बेरड यांनी प्राचार्य रामदिन यांच्या कार्याची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय तानाजी काळुंगे यांनी करून दिला. सत्काराची उद्घोषणा संदीप छिंदम यांनी केली. प्रा संतोष यादव, पर्यवेक्षिका सरोजनी रच्चा, ग्रंथपाल विष्णू रंगा यांनी रामदिन सरांच्या सहवासात केलेल्या कार्याच्या विविध क्षणांना उजाळा दिला.


संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, मार्कंडेय शाळेच्या सुधारणेत व गुणवत्ता वाढीत मुख्याध्यापक रामदिन यांचा मोलाचा वाटा आहे. शाळेला नवरुप देऊन त्यांनी डिजिटल क्लासरूम तयार केले. कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना आघाडीवर नेले. सुसज्ज ग्रंथालय त्यांच्या काळात झाले. या कार्यासाठी संस्थेने देखील पाठबळ दिले. शाळा व शाळाबाह्य उपक्रमात नेहमीच पुढाकार घेऊन शाळेला ऊर्जिता अवस्थेत आणले असल्याचे त्यांनी सांगितले.


भूषण देशमुख म्हणाले की, मुख्याध्यापक रामदिन स्नेहालय संस्थेच्या स्थापनेचे साक्षीदार आहेत. एक क्रीडा शिक्षक व नंतर मुख्याध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द बहरत गेली. त्यांना शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक वलय असल्याने त्यांनी निवृत्तीनंतर स्नेहालयासाठी वेळ देण्याचे सांगितले. माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण गोटीपामूल यांनी मुख्याध्यापकाची कारकीर्द महत्त्वाची असते. तो संपूर्ण शाळेला दिशा देत असतो. रामदिन सरांनी देखील कोरोना काळात पदभार स्वीकारून उत्तम काम केले असल्याचे सांगितले. दिपक रामदिन यांचे सुंदर असे चित्र रेखाटन मानपत्र नंदकुमार यन्नम यांनी केले. मानपत्राचे वाचन रेणुका खरदास यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयश्री मेहेर यांनी केले. आभार अर्चना साळुंके यांनी मानले. यावेळी नंदकुमार रामदिन, प्रवीण रामदिन, राजेंद्र रामदिन, संतोष बिज्जा आदी रामदिन कुटुंबीय उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *