• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

जिल्हा परिषदेत आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना अभिवादन

ByMirror

Nov 15, 2022

आदिवासी गौरव दिन साजरा

आदिवासींच्या न्याय, हक्कासाठी बिरसा मुंडा यांचा संघर्ष प्रेरणादायी -आशिष येरेकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंतीनिमित्त आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे, कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, पाणीपुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी के.आर. शेख उपस्थित होते.


आशिष येरेकर यांनी स्वातंत्र्यलढयात व आदिवासींच्या न्याय, हक्कासाठी बिरसा मुंडा यांचा संघर्ष प्रेरणादायी आहे. त्यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी मोठा लढा दिला. त्यांनी गरीब आदिवासी समाजाची निःस्वार्थी अंतःकरणाने सेवा केली. त्यांचा हा संघर्ष आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकिय बदलाची प्रक्रिया होती. त्यांचे योगदान व सेवा आजही समाजाला दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. तर आदिवासी बांधवांना आदिवासी गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


के.के. जाधव यांनी बिरसा मुंडा यांचे जन आंदोलन जहागीरदार व जमीनदार यांच्या शोषणाविरुद्ध होते. ब्रिटिश सत्ता उखडून टाकण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. दोन वर्षाचा सश्रम कारावास उपभोगून परत आल्यानंतर आदिवासींच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी राजकीय स्वातंत्र्याची आवश्यकता त्यांनी ओळखली. त्यासाठी संपूर्ण आदिवासी समाजाला संघटित करण्यासाठी प्रयत्न करुन त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्वातंत्र्यलढा पुकारुन समाजाला एकसंघपणे जोडण्याचे काम त्यांनी केले. समाज बदलाचा बिरसा मुंडा यांचा विद्रोह हा एक आदिवासींच्या पूर्ण स्वातंत्र्याचा विद्रोह होता, असे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *