• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना एक महिन्याचा निधी देण्याचे आयुक्तांचे आश्‍वासन

ByMirror

Oct 22, 2022

आमदार जगताप यांच्या प्रयत्नाने दिव्यांगाची दिवाळी गोड -अ‍ॅड पोकळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिव्यांगांना 5 टक्के निधी मिळण्याबाबत प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनातर्फे महापालिके समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. दिव्यांगांच्या आंदोलनाची दखल घेऊन मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी एक महिन्याचा निधी जमा करण्याबाबत दिलेल्या आश्‍वासनामुळे दिव्यांगांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे यांनी दिली.


दिव्यांगांना ऐन दिवाळीच्या सणाच्या वेळी आर्थिक अडचणीमध्ये महानगरपालिकेने केलेल्या सहकार्यामुळे दिव्यांगांना आधार मिळणार आहे. दिव्यांगांना हा निधी मिळून देण्यासाठी शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहे.

या मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. पोकळे, जिल्ह सचिव हमीद शेख, नगर तालुका अध्यक्ष किशोर सुर्यवंशी, प्रसिध्दी प्रमुख पोपट शेळके, शहर सचिव संजय बालटे, शहर उपाध्यक्ष संदेश रपारिया, विठ्ठल जाधव, काकासाहेब दसपुते, राजू मन्चे, गणेश कोमकुल, समर्थ गुड्डेवार यांनी पाठपुरावा केला होता.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *