• Thu. Oct 16th, 2025

उपक्रमशील शिक्षिका अनिता काळे यांचा सावित्री ज्योती पुरस्काराने गौरव

ByMirror

Oct 15, 2022

शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना जय स्वयंसेवी संस्था संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न जय युवा अ‍ॅकेडमीच्या वतीने राज्यस्तरीय सावित्री ज्योती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पद्मश्री पोपट पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सावित्री ज्योती महोत्सवात काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सिने चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. प्रशांत साळुंके, उद्योजक संजय गवारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात, राज्य आदर्श युवती पुरस्कार प्राप्त जयश्री शिंदे, मुख्य संयोजक अ‍ॅड. महेश शिंदे, पोपट बनकर आदी उपस्थित होते.


अनिता काळे या भिस्तबाग येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, त्या सामाजिक क्षेत्रात गत दोन दशकापेक्षा जास्त काळापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. सावित्रीबाई फुलेंचा वारसा पुढे चालवून त्या सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना विद्या दानाचे पवित्र कार्य करत आहे. तसेच जिल्हा परिषदेतील शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी त्यांनी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण देण्याची मोहिम देखील सुरु केली आहे. महिला सक्षमीकरण व गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांचे सातत्याने सुरु असलेल्या विविध उपक्रमाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मराठा समन्वय परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील, मोरे सर, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, गटशिक्षणाधिकारी बाबूराव जाधव, विस्तार अधिकारी रामनाथ कराड, केंद्र प्रमुख उदयकुमार सोनोळे, मिनाक्षी जाधव, मराठा समन्वय परिषद, मराठा सेवा संघ, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, शिक्षिका, जिजाऊ ब्रिगेड, प्रयास ग्रुप, दादी-नानी ग्रुपचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *