• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

माजी सैनिकांनी वृक्षरोपणाने साजरी केली महात्मा गांधी जयंती

ByMirror

Oct 3, 2022

जय हिंद फाउंडेशनचे खातगावला 41 झाडांची लागवड

देश प्रेमापोटी माजी सैनिकांची वृक्षरोपण चळवळ -शिवाजी पालवे

अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांनी खातगाव (ता.नगर) येथे वृक्षरोपणाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आगळ्या-वेगळ्या पध्दतीने जयंती साजरी केली. माजी सैनिकांच्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला होता.
गावातील माजी सैनिक संदीप कुलट, रावसाहेब कळमकर, किसनराव सातपुते, भाऊसाहेब सातपुते, रावसाहेब कुलट, नारायण कुलट, रमेश वेताळ, काशिनाथ सातपुते, राजू ठुबे, बाळासाहेब कुलट, गणेश कुलट, सुहास जते, किरण कळमकर यांच्या हस्ते वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, शिवाजी पठाडे, महादेव शिरसाठ, म्हातारदेव मुळे, बापू गायकवाड, भगवानराव कोल्हे, सुहास जपे, गणेश म्हस्के, संकेत कुलट, गोरख सातपुते, राजाराम म्हस्के, नामदेव कळमकर, मेजर संजय, मेजर विजय जपे आदी माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.


शिवाजी पालवे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने लढा दिला. देश आज पर्यावरणाच्या प्रश्‍नात जखडला जात असून, या प्रश्‍नातून सुटण्यासाठी वृक्षरोपण हा एकमेव मार्ग आहे. माजी सैनिक देश प्रेमापोटी वृक्षरोपण व संवर्धन चळवळीत योगदान देत असून, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाडे लावून जगविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


जयंती उपक्रमातंर्गत गावात वड, झाडे, चिंच, भेंडी, करंज आदी विविध प्रकारचे 41 झाडांची लागवड करण्यात आली. लावण्यात आलेल्या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी देखील गावातील माजी सैनिकांनी उचलली आहे. माजी सैनिकांनी राबविलेल्या वृक्षरोपण व संवर्धन अभियानाची ग्रामस्थांनी देखील कौतुक केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *