• Thu. Mar 12th, 2026

रेल्वे स्टेशन रोड परिसरात स्त्री शक्तीचा जागर करीत रंगली पारंपारिक मिरवणुक

ByMirror

Sep 27, 2022

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंब प्रतिष्ठानने केली घटस्थापना

महिलांचा उत्स्फुर्त सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त रेल्वे स्टेशन रोड येथील जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने घटस्थापनेची मिरवणुक काढण्यात आली. पारंपारिक ढोल पथकाच्या निनादात रंगलेल्या मिरवणुकीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्त्री शक्तीचा जागर केला. सजवलेल्या रथात जगदंबा मातेच्या मुर्तीने सर्व भाविकांचे लक्ष वेधले.


जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणुक काढण्यात आली होती. यामध्ये परिसरातील युवक-युवती, महिला, आजी-माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उदे गं, अंबे उदे…, आई जगदंबा व तुळजा भवानी मातेच्या जय घोषाने आसमंत दुमदुमला.

चौका-चौकात फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. पांढर्‍या साड्या व भगवे फेटे बांधून मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिलांची सर्वांचे लक्ष वेधले.


आमदार संग्राम जगताप यांनी मंडळास भेट देऊन नवरात्र उत्सवाच्या भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विधीवत घटस्थापना करण्यात आली असून, नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महिलांसाठी नऊ दिवस विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती सोमनाथ रोकडे यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *