• Thu. Nov 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

कार्तिक मासानिमित्त समर्पण सेवा संस्थेच्या महिलांची गोशाळेत नारायण प्रार्थना;

ByMirror

Nov 19, 2026
धन्वंतरी मंत्राचा जागर; भक्तीभावातून गोसेवेचा संदेश

गोमातेला चारा अर्पण करून आरोग्यदायी जीवनाचा संकल्प!


धन्वंतरी मंत्राचा जागर; भक्तीभावातून गोसेवेचा संदेश


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कार्तिक मासाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन समर्पण सेवा संस्थेच्या वतीने कुष्ठधाम रोड, सावेडी येथील सतनाम साक्षी गोशाळेत भक्तिमय वातावरणात नारायण प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या महिला सदस्यांनी विधिवत पूजा-अर्चना करून श्री नारायणाचे स्मरण केले. तसेच धन्वंतरी मंत्राचे सामूहिक उच्चारण करत सर्वांच्या निरोगी, निरामय आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.


कार्तिक मास हा भक्ती, साधना, दानधर्म आणि सेवाभाव जोपासण्याचा पवित्र महिना मानला जातो. या भावनेतून समर्पण सेवा संस्थेच्या महिलांनी गोशाळेत एकत्र येत धार्मिक उपक्रमात सहभाग घेतला. नारायण प्रार्थनेनंतर गोमातेची विधिवत पूजा करून गोशाळेत गोपरिक्रमा करण्यात आली. यावेळी गोशाळेतील जनावरांना चारा वाटप करून गोसेवेचा आनंदही अनुभवला.
यावेळी समर्पण सेवा संस्थेच्या अध्यक्षा रूपा पंजाबी, जागृती ओबेरॉय, शशी आनंद, अंकिता जग्गी, मीनू चढ्ढा, किरण छाब्रा, सुमन सहानी, कोमल सहानी, रीटा खन्ना, सरोज गुर्ली, रेखा पावा, पूनम खुल्लर, वर्षा तलवाड, बसंत वधवा, ज्योती पारेख, भाग्यरेखा पिंपळकर, चेतना गुगळे, रेखा खोसला आदी महिला उपस्थित होत्या.


केवळ धार्मिक विधीपुरते मर्यादित न राहता मुक्या प्राण्यांप्रती प्रेम, करुणा आणि संवेदनशीलता व्यक्त करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. गोसेवा ही भारतीय संस्कृतीतील महत्त्वाची परंपरा असून, प्राणीमात्रांप्रती दया आणि सेवाभाव जोपासणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याची भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा रूपा पंजाबी म्हणाल्या की, “कार्तिक मास हा भक्ती, श्रद्धा, सेवा आणि आत्मिक शुद्धतेचा संदेश देणारा पवित्र महिना आहे. या महिन्यात परमेश्वराचे स्मरण करण्याबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाप्रती आपले कर्तव्य पार पाडणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नारायण प्रार्थना आणि धन्वंतरी मंत्राच्या सामूहिक उच्चारणातून सर्वांना उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि निरोगी जीवन लाभावे, अशी आम्ही प्रार्थना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


गोमातेची सेवा ही केवळ धार्मिक परंपरा नसून त्यामागे प्रेम, कृतज्ञता आणि निस्वार्थ सेवाभावाची भावना आहे. मुक्या प्राण्यांची भूक भागविणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांच्याप्रती माणुसकी जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. समाजसेवा करताना माणसांबरोबरच पशुपक्ष्यांप्रतीही संवेदनशीलता असणे आवश्यक आहे. समर्पण सेवा संस्थेच्या माध्यमातून महिलांमध्ये सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि आध्यात्मिक विचारांची रुजवणूक करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *