संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळते नवी दिशा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कर्डिले ब्युरो नर्सिंग होम, यश प्यारा मेडिकल इन्स्टिट्यूट, यश अलाईड आणि शुभ नर्सिंग या संस्थांच्या माध्यमातून अत्यंत उल्लेखनीय कार्य सुरू आहे. गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांचे भविष्य घडविण्याचे काम या संस्थांच्या माध्यमातून होत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय बाबुराव कर्डिले आणि सौ. मंगल कर्डिले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले हे कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे मत मोहिनी खेडकर हिच्या पालकांनी व्यक्त केले.
संस्थेच्या ए.डी.एम.एल.टी. (ADMLT) अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये कु. मोहिनी मल्हारी खेडकर हिने शैक्षणिक गुणवत्तेत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. या यशाबद्दल तिचे पालकांनी आनंद व्यक्त करत संस्थेच्या वतीने मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी मोहिनीचे वडिल मल्हारी खेडकर म्हणाले की, मुलीच्या यशामागे तिची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांचा मोठा वाटा आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षक, प्राचार्य आणि संस्थेच्या व्यवस्थापनाचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असते. या संस्थेत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान दिले जात नाही, तर शिस्त, संस्कार, आत्मविश्वास आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शनही केले जाते. त्यामुळेच विद्यार्थ्यांना आपल्या स्वप्नांना गवसणी घालणे शक्य होत आहे.
संस्थापक अध्यक्ष बाबुराव कर्डिले, सौ. मंगल कर्डिले, प्राचार्य, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनामुळे मोहिनीला हे यश संपादन करता आले. याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. प्रास्ताविक कोमल पंचमुख यांनी केले.
मोहिनी खेडकर हिने विद्यार्थ्यांना संदेश देताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याने आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून गुरुजनांचा सन्मान करावा. मेहनत, प्रामाणिकपणा, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आयुष्यात मोठे यश संपादन करावे. आपल्या यशातून आई-वडील आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे हास्य फुलवावे. संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होत असून, संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

