• Mon. Oct 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात जगदंबा मातेच्या मंदिरात घटस्थापना; तुळजापूरच्या देवीच्या पालखीचे वाजत-गाजत स्वागत

ByMirror

Oct 12, 2026
नवरात्री स्वच्छता उत्सवातून आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नवरात्रोत्सवात भक्तीसोबत स्वच्छतेचा जागर; मंदिर परिसरात स्वच्छता अभियान


नवरात्री स्वच्छता उत्सवातून आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवरात्रोत्सवानिमित्त जगदंबा मातेच्या मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. यावेळी गावात तुळजापूरच्या देवीच्या पालखीचे मोठ्या उत्साहात वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. देवीच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने गाव परिसर दुमदुमून गेला. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी जगदंबा मातेच्या मंदिरात देवीची विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्यासह अरुण कापसे, अनिता फटांगडे, जया पवार, सविता कदम, मयूर कापसे, वर्षा जाधव, सूरज जाधव, कोमल जाधव, मंदा साळवे, तन्मय फटांगडे, नंदा घोलप, सुभद्रा कापसे, पै. संदीप डोंगरे, शिवाजी घोलप, शैलेश कापसे, मंदाताई डोंगरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते.


गावात तुळजापूरच्या देवीच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर वाद्यांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. निमगाव वाघा गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी जगदंबा मातेचे मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या धर्तीवर करण्यात आला आहे. जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ख्याती असून, नवरात्रोत्सवाच्या काळात पंचक्रोशीतील अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील धार्मिक वातावरण, देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची उपस्थिती आणि विविध उपक्रमांमुळे गावात उत्साहाचे वातावरण आहे.


जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात नवरात्री स्वच्छता उत्सव हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर निमगाव वाघा येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने जगदंबा मातेच्या मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानातून भाविक आणि ग्रामस्थांमध्ये सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती करण्यात आली. याच उपक्रमाचा पुढील भाग म्हणून स्वच्छता अभियानासोबत आरोग्य शिबिर आणि वृक्षारोपणाचे कार्यक्रमही राबविण्यात येणार आहेत. नवरात्री स्वच्छता उत्सवाच्या अनुषंगाने संस्थांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पै. नाना डोंगरे यांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *