• Tue. Sep 8th, 2026

Mirrornews24

Marathi News

विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027 अंतर्गत ‘विकसित भारत प्रश्‍नमंजुषा’ स्पर्धेचे आयोजन

ByMirror

Sep 8, 2026
अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांना सहभागी होण्याचे आवाहन

अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांना सहभागी होण्याचे आवाहन


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद (Viksit Bharat Young Leaders Dialogue VBYLD) 2027’ आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात ‘विकसित भारत प्रश्‍नमंजुषे’ने झाली असून 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींना 30 सप्टेंबर 2026 पर्यंत MY Bharat (mybharat.gov.in) पोर्टलवर ऑनलाइन सहभागी होता येणार आहे. प्रश्‍नमंजुषा विविध भारतीय भाषांमध्ये आयोजित करण्यात येत असून जिल्ह्यातील युवकांना यात सहभागी होण्याचे आवाहन मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष यांनी केले आहे.
VBYLD 2027 अंतर्गत युवकांच्या निवडीची प्रक्रिया प्रश्‍नमंजुषा निबंध आव्हान जिल्हास्तरीय स्पर्धा राज्य/केंद्रशासित प्रदेशस्तरीय VBYLD राष्ट्रीय VBYLD अशा टप्प्यांत होणार आहे. प्रश्‍नमंजुषेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागी युवकांना पुढील ‘विकसित भारत निबंध आव्हाना’साठी पात्र ठरण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या युवकांमधून जिल्हास्तरावर सादरीकरणासाठी निवड केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील उत्कृष्ट सादरकर्त्यांना राज्यस्तरीय VBYLD मध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. जिल्हास्तरीय स्पर्धा 10 ते 16 नोव्हेंबर 2026, तर राज्य/केंद्रशासित प्रदेशस्तरीय VBYLD 17 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2026 या कालावधीत होणार आहे.


या निवड प्रक्रियेतील उत्कृष्ट युवकांना 10 ते 12 जानेवारी 2027 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय VBYLD मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय स्तरावर युवकांना देशाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर आपल्या कल्पना, नवोन्मेषी उपाय आणि नेतृत्वदृष्टी मांडता येणार असून, निवडक युवकांना पंतप्रधानांसमोरही आपल्या कल्पना सादर करण्याची संधी मिळणार आहे.


अहिल्यानगर जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक मंडळे, युवा स्वयंसेवक तसेच सर्व पात्र युवक-युवतींनी या राष्ट्रीय उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माय भारतच्या वतीने करण्यात आले आहे. प्रश्‍नमंजुषेची अंतिम तारीख 30 सप्टेंबर असल्याचे सांगण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *