विविध क्षेत्रातील व्यक्तींना उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जाणार राज्यस्तरीय उडान पुरस्कार
पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- उडान फाउंडेशनच्या माध्यमातून 15 ऑगस्ट रोजी शहरातील टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक व विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशभक्तीवर गीते, देशभक्ती गीतांवरील नृत्य स्पर्धा, महाराष्ट्राची लोकधारा सादरीकरण अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश आहे.
या सोहळ्यात विविध क्षेत्रात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण, साहित्य, संस्था, उद्योजक, क्रीडा, योगा आदींमध्ये हिरारीने सातत्याने परिश्रमपूर्वक कार्य करणाऱ्या व्यक्तींना आणि युवकांना राज्यस्तरीय उडान पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविले जाणार आहे. या पुरस्कारासाठी व्यक्ती परिचय, केलेल्या कार्याची माहिती, फोटो, वर्तमानपत्रातील कार्यक्रमाचे कात्रणे 30 जुलैपर्यंत प्रस्ताव स्वरुपात पाठविण्याचे आवाहन उडान फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲड. आरती शिंदे यांनी केले आहे.
आरती शिंदे, आगडगाव, रतडगाव (ता. अहिल्यानगर) या पत्त्यावर प्रस्ताव पाठविण्याचे म्हंटले आहे. 30 जुलै प्रस्ताव पाठविण्याची शेवटची तारीख आहे. उशीरा आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. पुरस्कारासाठी आलेल्या प्रस्तावाची छाननी केली जाणार असून, निवड समितीमध्ये ॲड. प्रशांत साळुंके, प्रा. सुनील मतकर, मेजर भीमराव उल्हारे, जयश्री सोनवणे, डॉ. र्इसा शेख, ॲड. दिनेश शिंदे, जयश्री शिंदे, मीना म्हसे, शिवाजी नवले, डॉ. रमेश वाघमारे आदींचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी 9834298309 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

