मराठी भाषेचा प्रचार-प्रसार जतन व संवर्धनासाठी देणार योगदान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण विकास मंडळ संचलित चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयच्या शिक्षिका क्रांती सानप पालवे यांची मराठी राजभाषा संवर्धन कृती समितीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मराठी भाषेचा प्रचार-प्रसार, जतन, संवर्धन आणि दैनंदिन व्यवहारात तिचा अधिकाधिक वापर वाढवा या उदात्त उद्देशाने ही कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. क्रांती सानप पालवे उत्तम कवियत्री व लेखिका असून आकाशवाणी तसेच विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या कविता व लेख प्रसिद्ध झालेल्या आहेत. हिंदी पंडित परीक्षेत सुद्धा त्यांनी राज्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविला असून त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या मराठी राजभाषा परीक्षेत उत्तम कामगिरी केली आहे. अनेक उत्तम कवितांसाठी त्यांना लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट कोल्हापूर संचलित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत त प्रथम क्रमांक व पुरस्कार मिळालेला आहे.
त्यांच्या याच कामाची दखल घेऊन मराठी राजभाषा संवर्धन कृती समिती राज्य संघटनेच्या प्रमुख सुलोचना क्षीरसागर व अमोल क्षीरसागर व राज्य कार्यकारणी यांनी क्रांती सानप यांची जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड केली. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष संपत बारस्कर, सचिव भूषण अनुभुले, खजिनदार सुदाम भोर व प्राथमिकचे मुख्याध्यापिका मनीषा कासार, माध्यमिकचे मुख्याध्यापक रावसाहेब सातपुते, पर्यवेक्षक शंकरराव बारस्कर तसेच सर्व विश्वस्त मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.

