• Thu. Mar 26th, 2026

मराठी राजभाषा प्रावीण्य परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेची दमदार कामगिरी

ByMirror

Mar 26, 2026

राज्यात प्रथम क्रमांकासह 78 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत झेप


अनिश गोरे राज्यात प्रथम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्था संचलित कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषा प्रावीण्य परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेचा नवा उच्चांक गाठला आहे. यावर्षीही राज्यात प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या विद्यार्थ्याने मानाचा तुरा रोवला असून, शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची छाप उमटवली आहे. अनिश विनायक गोरे राज्याच्या गुणवत्ता यादीत प्रथम आला आहे.


या परीक्षेत शाळेतील तब्बल 10 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले, तर 32 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आणि 36 विद्यार्थी केंद्र गुणवत्ता यादीत चमकले. एकूण 78 विद्यार्थ्यांनी विविध गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला.


विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहविभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, लाईफ मेंबर सदस्य शिवाजी लंके व प्रमोद तोरणे, तसेच प्राचार्य छाया काकडे आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.


या यशामागे शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, वर्गशिक्षिका मीनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, शितल रोहोकले, जयश्री खांदोडे, सोनाली अनभुले, रूपाली पांडुळे, भाग्यश्री लोंढे, भारती सुसरे, इंदुमती दरेकर, कांचन मदने आणि पूनम धाडगे यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *