• Tue. Mar 3rd, 2026

प्रणव डावखर पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षा उत्तीर्ण

ByMirror

Mar 3, 2026

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रणव डावखर याने जानेवारी 2026 मध्ये झालेल्या सीए फायनलच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात चांगले गुण प्राप्त करून यश संपादन केले. भविष्यात वित्तीय क्षेत्रात प्रामाणिक व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.


प्रणव हा राहुरी येथील डावखर पाटील ॲग्रो सर्व्हिसेस चे यशवंतराव डावखर व नगर येथील एसटी संघटनेचे नेते दिनकर लिपाने यांचे नातू आहे. सीए सारख्या कठीण व प्रतिष्ठेच्या परीक्षेत अथक परिश्रम व चिकाटीच्या बळावर त्याने यश संपादन केले आहे. या परीक्षेत मार्गदर्शक म्हणून नगर येथील सीए सुशील जैन यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. प्रणव याने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांना दिले आहे. या यशाबद्दल नातेवाईक व मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *