• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

सदा विजय (270 इंजिनिअर रेजिमेंट) परिवारातील भारतीय जवानांच्या बाईक रॅलीने वेधले लक्ष

ByMirror

Feb 10, 2026
बाईक रॅलीचे अहिल्यानगरमध्ये स्वागत

बाईक रॅलीचे अहिल्यानगरमध्ये स्वागत


देशप्रेम, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी बाईक रॅली – माजी सैनिक किरण कार्ले

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सदा विजय (270 इंजिनिअर रेजिमेंट) परिवारातील भारतीय जवानांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली बाईक रॅली पुणे येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ होऊन विविध शहरांतून मार्गक्रमण करत अहिल्यानगर शहरात दाखल झाली. देशसेवा, माजी सैनिकांचे प्रश्‍न, सामाजिक ऐक्य आणि देशप्रेमाची भावना जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या या रॅलीचे अहिल्यानगरमध्ये ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.


रॅलीच्या आगमनप्रसंगी अहिल्यानगर येथील सदा विजय परिवारातील सर्व माजी सैनिक व माजी सैनिक किरण बाबासाहेब कार्ले (निवृत्त आर्मी, 270 इंजिनिअर रेजिमेंट) यांच्या वतीने रॅलीतील सर्व सहभागी लष्करातील जवानांचा पुष्पहार, पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देऊन स्वागत व गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी प्रतीक्षा किरण कार्ले, मुलगी स्वराली किरण कार्ले, वडील बाबासाहेब नाना कार्ले व आई नंदा बाबासाहेब कार्ले यांची उपस्थिती होती.
माजी सैनिक किरण कार्ले म्हणाले की, ही बाईक रॅली केवळ एक प्रवास नसून, देशप्रेम, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा एक प्रेरणादायी उपक्रम आहे. देशासाठी आयुष्याचा महत्त्वाचा काळ अर्पण करणाऱ्या माजी सैनिकांच्या समस्या समाजापर्यंत पोहोचवणे आणि त्या सोडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे हे आमचे कर्तव्य आहे. या रॅलीमुळे तरुण पिढीमध्ये देशसेवेची प्रेरणा निर्माण होत असून, शिस्त, त्याग व राष्ट्रप्रेमाचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या बाईक रॅलीचा मुख्य उद्देश माजी सैनिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेणे, देशासाठी सेवा केलेल्या जवानांप्रती समाजात कृतज्ञतेची भावना निर्माण करणे, तरुण पिढीमध्ये देशप्रेम, शिस्त व सामाजिक बांधिलकी रुजवणे हा होता. तसेच समाजात सकारात्मक संदेश पोहोचवून एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यावरही भर देण्यात आला आहे.


या उपक्रमास अहिल्यानगर शहरातील नागरिक, विविध सामाजिक संघटना तसेच माजी सैनिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बाईक रॅलीमुळे देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते, अनेक नागरिकांनी रॅलीचे कौतुक केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *