• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

विजय भालसिंग यांना इचलकरंजीचा मानाचा मराठी रत्न प्रेरणा पुरस्कार जाहीर

ByMirror

Jan 15, 2026

राष्ट्रीय प्रेरणा किरण गौरव सन्मान सोहळ्यात निस्वार्थ सामाजिक कार्याचा होणार गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील विजय भालसिंग यांना सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रात सुरू असलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल राष्ट्रीय प्रेरणा किरण गौरव सन्मान सोहळा इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील मानाचा मराठी रत्न प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


सदर पुरस्काराचे वितरण 25 जानेवारी रोजी फॉर्च्यून सिनेलेक्स इचलकरंजी या ठिकाणी होणाऱ्या संमेलनात मराठी अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर ( स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेतील अभिनेत्री) व अनेक मान्यवरांच्या हस्ते भालसिंग यांना प्रदान केले जाणार असल्याची माहिती स्वागत अध्यक्ष व निमंत्रक प्रा.डॉ. बी.एन. खरात व संस्थापक अध्यक्ष ए.जे. फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) प्रेरणा किरण गौरव सोहळा निवड समितीच्या वतीने देण्यात आली आहे.


सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात विजय भालसिंग गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहे. मूळगाव वाळकी (ता. नगर ) येथील असलेले भालसिंग एस. टी. बँकेची नोकरी सांभाळून निस्वार्थपणे कार्यरत असून, कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सामाजिक कार्य करत आहे. वृक्षरोपण व संवर्धनासाठी ते सातत्याने योगदान देत आहेत. उन्हाळ्यात पशू – पक्ष्यांना जगणे सुसहय व्हावे म्हणून पाणवठे तयार करून पाणी उपलब्ध करणे, विविध परिसरात पक्ष्यासाठी झाडांवर धान्य व पाण्याची भांडी बसविणे, सर्वत्र वाढत चाललेल्या सिमेंटच्या जंगलामुळे पशु-पक्ष्यांचे अस्तिव राहण्यासाठी नारळाच्या साली पासून कृत्रिमरीत्या पक्ष्यांसाठी बनवलेले घरटी बसविणे आदी निसर्ग व पर्यावरणपुरक उपक्रम ते सेवाभावाने सातत्याने राबवित आहे.


वाळकी पंचक्रोशीतील खराब रस्त्याबाबत सतत पुढाकार व पाठपुरावा करून त्यांनी अनेक खराब रस्त्याच्या मूलभूत प्रश्‍नासाठी वाचा फोडून ते प्रश्‍न मार्गी लावले आहेत. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी देखील अनेक विविध पुरस्काराने सन्मानित करण्यांत आले आहे. भालसिंग यांना सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *