25 वर्षांची अखंड परंपरा; रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन
कलियुगात भाविकांना नामस्मरणाने ईश्वर प्राप्तीचा सुख -अमोल येवले
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील पाच गोडाऊन प्रगणात माऊली प्रतिष्ठाण वारकरी सेवा संघ द्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानेश्वरी पारायणचे हे रोप्य महोत्सवी वर्ष असून गेल्या 25 वर्षांपूर्वी पासून ही परंपरा पुढे चालत आहे.
या धार्मिक सप्ताहाचे उद्घाटनाप्रंगी माजी नगसेवक अमोल येवले, विजय पठारे, सुनिल कोतकर, गोवर्धन सुर्यवंशी, ह.भ.प. शिगोटे नाना, ह.भ.प बाळासाहेब बोरकड, ह.भ.प. स्वानंद जोशी, भीमा सातपुते, भागिनाथ कोतकर, भागवत सातपुते, विक्रम विरकर, अवधुत काळे, सुरज ठोंबरे, उदय जासुद, गोरख कार्ले, मयुर सूर्यवंशी, मयुर जाधव, तुषार बोरकद, नंदकिशोर सुर्यवंशी, दिलीप महाराज आदींसह भजनी मंडळी उपस्थित होते.
अमोल येवले म्हणाले की, कलियुगात भाविकांना नामस्मरणाने ईश्वर प्राप्तीचा सुख मिळतो. धकाधकीच्या जीवनात भक्तीमार्गाने जीवनात सुख, समाधान निर्माण होत असतो. सुख, समाधान प्राप्तीसाठी धर्म मंडपाशिवाय पर्याय नाही. येथूनच परमार्थाचा खरा मार्ग सापडतो. अखंड हरिनाम सप्ताहाने भावी पिढीवर संस्कार रुजत असतात. भरकटलेल्या युवक-युवतींना दिशा देण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाशिवाय पर्याय उरलेला नाही, सुभाष महाराज यांनी 25 वर्षांपूर्वी लावलेले छोटे वृक्ष आता मोठे झाले आहे. रौप्य महोत्सव साजरा होत असताना, केडगावमध्ये ही परंपरा अखंड सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विजय पठारे म्हणले की, वारकरी संप्रदायामुळे समाजात संस्कृती व संस्कार टिकला आहे. समाजप्रबोधनाने समाजाला दिशा दिली जात आहे. जीवनाला भक्तीमार्ग दाखविण्यासाठी युवकांना अखंड हरिनाम सप्ताह दिशादर्शक ठरत आहे. धार्मिकतेला समाजसेवेची जोड मिळाल्यास समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ह.भ.प. शिगोटे नाना म्हणाले की, या कार्याची मुहूर्तमेढ ब्रह्मलीन सुभाष महाराज सूर्यवंशी यांनी रोवली. ग्रामीण भागात परमार्थ सहज रुजतो, मात्र शहरी भागात तो रुजवण्यासाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून केडगावमध्ये वारकरी संघाची स्थापना झाली. हा सप्ताह महाराष्ट्रात नामांकित व्हावा, अशी त्यांची इच्छा होती, या स्वप्नपूर्तीच्या दिशेने कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या धार्मिक सोहळ्यास आमदार संग्राम जगताप, अमोल येवले व विजय पठारे याचे सहकार्य लाभले.
