• Tue. Dec 30th, 2025

हरदिन मॉर्निंग ग्रुप व सपकाळ परिवाराच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम; सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन आणि माणुसकीचा संदेश

ByMirror

Dec 24, 2025

भिंगार शहरातील गरजूंना ब्लँकेटचे वाटप

आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीत हरदिन मॉर्निंग ग्रुपचे कार्य दिशादर्शक -पल्लवी विजयवंशी (मुख्य कार्यकारी अधिकारी)

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिवाळ्याच्या कडाक्याची थंडी वाढत असताना भिंगार शहरातील रस्त्यावर, उघड्यावर जीवन जगणाऱ्या गरजूंना आधार देण्यासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सर्वेश संजय सपकाळ परिवाराच्या वतीने ब्लँकेट वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. थंडीमुळे अंगात हुडहुडी भरत असताना या उपक्रमामुळे अनेक निराधार, गरजू नागरिकांना उबदार आधार देण्यात आला.


भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे आयोजित कार्यक्रमात छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी व नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या हस्ते गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक उपक्रमासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.


कार्यक्रमास हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्यासह सचिन चोपडा, जहिर सय्यद, सर्वेश सपकाळ, दिलीप ठोकळ, प्रांजली सपकाळ, विद्याताई सोनवणे, पीएसआय पुजाताई वराडे, संगिता सपकाळ, करुणा फळे, सुनिताताई वराडे, ज्योती भिंगारदिवे, सविता परदेशी, वेदिका फळे, मिराताई भिंगारदिवे, दिपकराव धाडगे, दिलीप गुगळे, रमेश वराडे, संजय भिंगारदिवे, दिनेश शहापुरकर, इंजि. निखील शिंदे, सुभाष पेंढुरकर, अभिजित सपकाळ, सईद खान, कलीम शेख, मुन्ना वाघस्कर, सुहासराव सोनवणे, शंशाक अंबावडे, परेश मेवानी, दिपक अमृत, विशाल भामरे, अविनाश पोतदार, शेषराव पालवे, रामनाथ गर्जे, प्रविण परदेशी, संजय गवळी, मुकेश मुथियान, कोंडीराम वाघस्कर, कुमार धतुरे, विनोद खोत, प्रसाद भिंगारदिवे, सखाराम अळकुटे, अनिल शिरसाठ, भरत दंडोरे, गौतम भिंगारदिवे, काशिनाथ सांळुंके, नारायण नायकू, सार्थक साठे, अजेश पुरी, सुनिल खताडे आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी म्हणाल्या की, “आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही बाबींमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपचे कार्य दिशादर्शक आहे. केवळ स्वतःपुरते न पाहता समाजातील दुर्बल घटकांसाठी हातभार लावण्याची भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे. अशा उपक्रमांतून समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे त्यांनी सांगितले.


सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, थंडीच्या दिवसांत रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी अशा प्रकारचे उपक्रम खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरतात. सामाजिक संस्थांनी पुढे येऊन केलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले.


संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपचा प्रत्येक सदस्य सामाजिक जाणीव ठेवून कार्य करतो. वर्षभर विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जातात. ग्रुपमधील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करून त्या वृक्षांचे संवर्धन करण्याची परंपरा आम्ही जपतो. वंचित व गरजूंना आधार देणे हीच आमची खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे सांगितले.


संजय भिंगारदिवे यांनी सपकाळ परिवार दरवर्षी थंडीच्या काळात राबवत असलेला ब्लँकेट वाटपाचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तर संजय चोपडा म्हणाले की, “हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून एक व्यापक सामाजिक चळवळ उभी राहत आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात सुरू असलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले.


थंडीच्या दिवसांत उघड्यावर जीवन जगणाऱ्या गरजू व निराधार नागरिकांना उबदार ब्लँकेट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना अल्पोपहाराचेही वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *