माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या निधीतून व पै. महेश लोंढे यांच्या पाठपुराव्याने प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी
नगर-कल्याण रोड परिसरात विकासकामांना गती -पै. महेश लोंढे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड परिसरातील दातरंगे मळा येथील नागरिकांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नुकताच पार पडला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून पै. महेश लोंढे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या रस्त्याचे काम सुरु झाले आहे.
पावसाळ्यात चिखल, खड्डे व वाहतुकीच्या अडचणींमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर दातरंगे मळा परिसरातील रस्ता काँक्रिटीकरणाची मागणी सातत्याने होत होती. अखेर या मागणीची दखल घेत रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या रस्त्यामुळे परिसरातील दळणवळण सुलभ होणार असून नागरिकांचा दैनंदिन त्रास कमी होणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी श्याम लोंढे, पै. महेश लोंढे, पद्माताई बोरुडे, अभिजीत बोरुडे, अरविंद शिंदे, शरद दातरंगे, हरिभाऊ येलदंडी, रोहन शिरसाठ, विजय लांडे, अशोक हरबा, शिंदे मामा, दत्ता दातरंगे, नारायण गायके, पिंटू बिल्लाडे, चंदने मामा, गोरख वाघ, सचिन ठाणगे, सोनू आगरकर, निलेश दातरंगे, आकाश घोडके, कुणाल कुरापट्टी, गणेश आंबेकर, अभिजीत गवळी, रवी खुल्लभ, शुभम लोंढे, ओम खंडागळे, ओम लोंढे, अभय बेरड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
पै. महेश लोंढे म्हणाले की, नगरकल्याण रोड परिसरातील अनेक प्रलंबित विकासकामे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आली आहेत. प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून विविध कामे हाती घेण्यात आली असून, सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केवळ उद्घाटनापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्षात विकासकामे पूर्णत्वास नेण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या रस्त्याच्या कामासाठी तातडीने दखल घेत प्रश्न मार्गी लावल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले. आता पावसाळ्यात चिखल व खड्ड्यांमुळे होणारा त्रास टळणार असून सुरक्षित आणि सुकर वाहतुक होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
