• Wed. Dec 31st, 2025

केडगावमध्ये संस्कृतीचा जागर करणारा रंगला लोककलेचा कॉन्सर्ट शो

ByMirror

Dec 18, 2025

महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; कार्यक्रमाला हळदी-कुंकूची जोड


केडगाव जागरूक नागरिक मंचचा उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव जागरूक नागरिक मंचच्या वतीने केडगाव येथे महिलांसाठी महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, लोककला व लोकधारा मांडणारा भव्य डिजिटल लाईव्ह कॉन्सर्ट शो उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचे सक्षमीकरण, सांस्कृतिक जाणीव निर्माण करणे, लोककलेचा प्रचार व समाजातील महिलांना एकत्रित आणणे या उद्देशाने आश्‍विनी विशाल पाचारणे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.


केडगाव येथील शाहूनगर, पाच गोडाऊन मैदानावर आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध लोककला आणि लोकधारांचे सुमारे 50 कलाकारांनी प्रभावी सादरीकरण केले. निर्माते-दिग्दर्शक अनिल जाधव यांनी संकल्पना व मांडणी केलेल्या या कार्यक्रमात गायिका गायत्री शेलार यांनी सादर केलेल्या गवळणी तसेच चित्रपट गीतांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी विशेष ‘धुमाकूळ’ हा सांस्कृतिक कार्यक्रमही रंगला असून, त्याला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.


या कार्यक्रमाला केडगावमधील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. उपस्थित महिलांसाठी सोडत पद्धतीने विविध आकर्षक बक्षिसांचे आयोजन करण्यात आले होते. पैठणी साडी, कुकर, मिक्सर, इलेक्ट्रिक शेगडी, टेबल फॅन आदी वस्तू बक्षीस स्वरूपात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन देण्यात येणार आहेत. या सोडतीत प्रथम क्रमांक रोहिणी शिवाजी वाकचौरे, द्वितीय क्रमांक कल्याणी अशोक गुंजाळ, तृतीय क्रमांक मानसी कुणाल वामन यांनी पटकावला. याशिवाय अनेक महिलांना विविध बक्षिसांनी सन्मानित करण्यात आले. सर्व उपस्थित महिलांना घरपोच वाण वाटप केले जाणार आहे.


कार्यक्रमास दिलीप सातपुते, आदर्श गाव सुपाचे सरपंच दत्ता पवार, भरत ठुबे, संग्राम कोतकर, अमोल येवले, ओमकार सातपुते, अविनाश साठे, सुरज कोतकर, दत्ता जाधव, वैभव कदम, मंदार सटाणकर, प्रवीण पाटसकर, सुनील नांगरे, शारदा शिरसाट, अतुल लवांडे, संतोष पानसरे, सचिन पवार, प्रकाश बिडकर, डॉ. सुभाष बागले, सनी पाचारणे, संदीप ठाणगे, शिवाजी झावरे, संदीप सुंबे, प्रवीण ठुबे, सूर्यकांत काळे, निवडुंगे सर, बाळासाहेब रोहाकले सर, फेमस मिमिक्री स्टार शरद औटी तसेच केडगाव जागरूक नागरिक मंचचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *