कामे करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी नागरिकांनी उभे रहावे -जालिंदर कोतकर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव, प्रभाग क्रमांक 17 मधील दूधसागर सोसायटी परिसरात ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ सर्व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
दूधसागर सोसायटी परिसरात अनेक वर्षापासून ड्रेनेज लाईनच्या कामाचा प्रश्न भेडसावत होता. 30 लाख रुपये खर्चाच्या या कामास मंजूरी मिळून सदरचे काम सुरु झाले आहे. या परिसरात विकासकामे प्रलंबित होती. माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून यापूर्वी डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच गणपती मंदिरासाठी 10 लाख रुपयांचा सभामंडप उपलब्ध करुन देण्यात आला. अनेक विकास कामे विखे यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आली असून, प्रलंबित कामेही पूर्ण होणार आहेत. महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण तयार झाले असले तरी, प्रत्यक्ष विकासनिधी आणून कामे करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी नागरिकांनी उभे राहण्याचे आवाहन उद्योजक जालिंदर कोतकर यांनी केले आहे.
विकासकामे करण्यासाठी सातत्याने पाठपुराव्याची गरज भासते. फक्त निवडून येऊन विकास कामे होत नाही, काम करणारा नगरसेवकाची या प्रभागाला गरज आहे. यासाठी काम करणाऱ्याच्या मागे जनता उभी असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी प्रशांत चितळे, राजाराम काळे, पोपट खताळ, अशोक शिनगान, सौरभ सुनकुळे, सुवर्णा मिसाळ, अंबाबाई ओहोळ, सुवर्णा सहाने, बंदी काळपुंड,,दीपक रोकडे,,वर्षा चव्हाण, पूजा चितळे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
