सर्व महिलांना सहभागी होण्याचे आवाहन
महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम; केडगाव जागरुक नागरिक मंचचा उप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव जागरुक नागरिक मंचच्या वतीने महिलांसाठी रविवारी (दि. 14 डिसेंबर) हळदी-कुंकू कार्यक्रम व महाराष्ट्राची संस्कृती लोककला व लोकधारा मांडणारा डिजीटल लार्इव्ह कॉन्सर्ट शो चे आयोजन करण्यात आले आहे. 50 कलाकारांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सर्व महिलांना सहभागी होण्याचे आवाहन आश्विनी विशाल पाचारणे यांनी केले आहे.
या कार्यक्रमात गायिका गायत्री शेलार महाराष्ट्राची संस्कृतीवर विविध गीत सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची निर्मिती व दिग्दर्शन अनिल जाधव यांनी केले आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती, लोककला आणि परंपरा आधुनिक डिजिटल माध्यमातून मांडणारा हा शो पहिल्यांदाच केडगावमध्ये होत आहे. हा कार्यक्रम सर्व महिलांसाठी निशुल्क आहे. कार्यक्रम रविवारी सायं. 5.00 वाजता पाच गोडाऊन, भाजी मार्केट ग्राउंड, शाहूनगर रोड, केडगाव येथे होणार आहे. या उपक्रमातून महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक जाणीव, लोककलेचा प्रचार व समाजातील एकोपा वाढविणे हा प्रमुख हेतू असल्याचे आश्विनी पाचारणे यांनी म्हंटले आहे.
हळदी-कुंकू कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या महिलांसाठी विशेष लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित महिलांचीच नावे लकी ड्रॉमध्ये जाहीर होतील. बक्षिसे 31 डिसेंबरपर्यंत संबंधित महिलांच्या पत्त्यावर पाठविण्यात येतील. त्यामुळे कार्यक्रमास येणाऱ्या महिलांनी आपला पूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नोंदवावा, असे आयोजकांनी सांगितले आहे.
