अस्मिता ॲथलेटिक्स लीग मुलींसाठी प्रेरणादायी – डॉ. सुस्मिता विखे पाटील
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- खेलो इंडिया उपक्रमांतर्गत आयोजित अस्मिता ॲथलेटिक्स लीग मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी असून, अशा खेळ उपक्रमांची सध्या गरज असल्याचे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी केले .
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लोणी येथे अस्मिता ॲथलेटिक्स लीग स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये जिल्हयातील 600 खेळाडू मुलींनी सहभाग घेत बक्षीसांची लयलुट करत खेळाचा मनसोक्त आनंदही लुटला . करण्यात आली आहे.
मुलींशी संवाद साधताना डॉ. सुस्मिता विखे म्हणाल्या की, या लीगचे प्राथमिक उद्दिष्ट क्रीडा स्पर्धामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे, ॲथलेटिक्सला प्रोत्साहन देणे आणि जिल्ह्यांमधील तळागाळातील क्रीडा नैपुण्य शोधणे व क्रीडा संस्था मजबूत करणे असा आहे.
केंद्र शासनाच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अस्मिता ॲथलेटिक्स लीग स्पर्धेचे आयोजन 14 व 16 वर्षांखालील मुलींसाठी करण्यात आले होते. यावेळी प्राचार्या डॉ .अनुश्री खैरे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव, सचिव दिनेश भालेराव, डॉ. उत्तम अनाप उपस्थित होते .
भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनकडून स्पर्धा निरीक्षक म्हणून रोहित घाग उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन प्रवरा स्पोर्टस अकॅडमी आणि अहिल्यानगर जिल्हा अमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दिनेश भालेराव, रमेश वाघमारे, रमेश दळे, संदीप हारदे, संदीप घावटे, श्रीरामसेतू आवारी, राहुल काळे, जगन गवांदे, अजित पवार, अमित चव्हाण, विश्वेषा मिस्किन परिश्रम घेतले.
अस्मिता ॲथलेटिक्स लीग 2025 स्पर्धेचा निकाल:-
60 मी धावणे प्रथम- गौरी अजय कुलाल, द्वितीय- ज्ञानेश्वरी तुळशीराम काकडे, तृतीय- धनश्री नाना भोये.
600 मी धावणे प्रथम- गौरी अजय कुलाल, द्वितीय- ज्ञानेश्वरी लामखडे, तृतीय- उर्मिला शिवाजी महाले.
लांब उडी प्रथम- समीक्षा दत्तात्रय वाळुंज, द्वितीय- श्रावणी सुदाम हरदे, तृतीय- प्रणाली पोपट कोरडे.
उंच उडी प्रथम- शिंदे दर्शना, द्वितीय- भालेराव श्रद्धा दीपक, तृतीय- जोधर प्रतीक्षा रोमेश.
गोळा फेक प्रथम- वाघमारे श्रावणी, द्वितीय- सुपेकर अक्षिता दिलीप, तृतीय- बनकर साक्षी बाळासाहेब.
थाळी फेक प्रथम- सिद्धी थोरात, द्वितीय- अक्षदा दिल्ली सुपेकर, तृतीय- यशस्वी लोंढे.
भाला फेक प्रथम- कुमुदिनी श्याम निकम, द्वितीय- पूजा पांडुरंग भोये, तृतीय- भोईर अश्विनी.
ट्रायथलॉन A प्रथम- श्रुती गोरक्षनाथ सांगळे, द्वितीय- कीर्ती संदीप सिनारे, तृतीय- गीते ईश्वरी प्रदीप.
ट्रायथलॉन B प्रथम- तेजस्विनी दिलीप भोये, द्वितीय- सानिक संतोष शेळके, तृतीय- पायल लामखडे.
ट्रायथलॉन C प्रथम- स्मितल नागपुरे, द्वितीय- सोनाक्षी अक्षय तडवी, तृतीय- वैभवी खेडकर.
किट भाला फेक प्रथम- लावण्या देवकर, द्वितीय- वैभवी वाबळे, तृतीय- पृथा ढवळे.
