• Sun. Jun 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

कुराश स्पर्धेत रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंची विभागीय पातळीवर यश

ByMirror

Nov 27, 2025
तीन खेळाडूंची राज्यस्तरावर निवड; 12 विद्यार्थ्यांनी पटकावले पदक

तीन खेळाडूंची राज्यस्तरावर निवड; 12 विद्यार्थ्यांनी पटकावले पदक

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय विभागीय कुराश स्पर्धेत शहरातील रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या खेळाचा ठसा उमटवला. या स्पर्धेतून शाळेतील आरुषी लांडगे, सार्थक तनपुरे व युवराज आव्हाड या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली असून शहरासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.


ही विभागीय स्पर्धा वाडियापार्क क्रीडा संकुल येथे झाली. स्पर्धेत पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, अहिल्यानगर शहर व अहिल्यानगर ग्रामीण या विभागांतील खेळाडू सहभागी झाले होते. कठीण स्पर्धेला सामोरे जात रुपीबाई मोतीलालजी बोरा विद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत अनेक पदके पटकावली. राज्यस्तरीय कुराश स्पर्धा इंदापूर येथे होणार आहे.


या स्पर्धेत प्रथम क्रमांक- आरुषी लांडगे, युवराज आव्हाड, सार्थक तनपुरे, द्वितीय क्रमांक- धनश्री दहिवळ, आरोही खवळे, नक्षत्रा कुंटला, ओम दहिफळे, विराज खरपुडे, तृतीय क्रमांक- सिमरन शेख, ओम लकडे, यशश्री पोळ, दिव्या मेढे यांनी पटकाविले. या खेळाडूंना क्रीडा शिक्षिका अंजली देवकर व अमोल धानापूर्ण यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी साधली.


या यशस्वी खेळाडूंचा सत्कार संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी खेळाडूंचे कौतुक करुन राज्यस्तरावरही हे विद्यार्थी निश्‍चितच उत्कृष्ट कामगिरी करणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी संस्थेचे सहकार्यवाह गौरव फिरोदिया, नियामक मंडळाचे चेअरमन अशोक मुथा, शाळा समितीचे चेअरमन भूषण भंडारी, सदस्य गौरव मिरीकर, विश्‍वस्त सुनंदाताई भालेराव, मुख्याध्यापक अजय बारगळ, उपमुख्याध्यापक आर.एन. भांड, पर्यवेक्षक व्ही.बी. गिरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *