विभागीय मैदानी स्पर्धेत चमकदार कामगिरी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशनच्या खेळाडूंनी पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे झालेल्या शालेय विभागीय मैदानी स्पर्धेत अंतर विभागीय महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करत 09 पदके प्राप्त केली. यामधील 4 खेळाडूंची 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान डेरवण, रत्नागिरी या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे.
विभागीय मैदानी स्पर्धेत ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशनचे खेळाडू कौस्तुभ तोडकर – 100 मी धावणे, 200 मी धावणे द्वितीय क्रमांक, ओम पवार – 600 मी धावणे द्वितीय क्रमांक, सर्वेश दळवी – 400 मी हार्डल्स धावणे द्वितीय क्रमांक, 400 मी धावणे तृतीय क्रमांक, विराज भोसले – 5 किलोमीटर चालणे द्वितीय क्रमांक, गौरी कुल्लाळ – 400 मी धावणे तृतीय क्रमांक , 400 मी हार्डल्स धावणे तृतीय क्रमांक, तसेच आंतर विद्यापीठ विभागीय मैदानी स्पर्धा साहिल खाटेकर याने 400 मीटर हार्डल्स तृतीय क्रमांक व 4×400 मीटर रिले मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे.
या खेळाडूंना मुख्य मार्गदर्शक दिनेश भालेराव व सहाय्यक मार्गदर्शक अमित चव्हाण, विश्वेषा मिस्कीन, साक्षी मोरे, गुलजार शेख यांचे मार्गदर्शन लाभले. पदक पटकाविलेल्या खेळाडूंचे अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील जाधव व ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष अतिक शेख, क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, उपाध्यक्ष शफीक शेख, संदीप घावटे, रमेश वाघमारे, जगन गवांदे, श्रीराम सेतू आवारी व ट्रॅक रेसर्स स्पोर्टसच्या पालकांनी व खेळाडूंनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
