नवरात्र उत्सवाचा सामाजिक उपक्रम
स्वच्छतेमुळे भक्ती अधिक पवित्र होते -संजय सपकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील श्री रेणुका माता मंदिर परिसरात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी या उपक्रमात ग्रुपच्या सदस्यांनी हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली. मंदिरात देवीच्या दर्शनाला दरवर्षी नवरात्र उत्सवाला हजारो भाविकांची गर्दी होत असते, या पार्श्वभूमीवर हा उपक्रम महत्त्वाचा ठरला.
या स्वच्छता अभियानात हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेशराव वराडे, जहीर सय्यद, सचिनशेठ चोपडा, मेजर दिलीपराव ठोकळ, रतनशेठ मेहेत्रे, सर्वेश सपकाळ, मनोहर दरवडे, सुधीर कपाळे, विलास आहेर, अभिजीत सपकाळ, अशोकराव पराते, अविनाश जाधव, दीपकराव घोडके, सुभाष पेंढुरकर, सुंदरराव पाटील, अनिलराव सोळसे, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, दीपक घोडके, सार्थक साठे, राजेंद्र चंगेडिया, रवींद्र जाजू, श्रीरंग देवकुळे, दिलीप गुगळे, कुमार धतुरे, शेषराव पालवे, अविनाश पोतदार, दशरथ मुंडे, प्रकाश देवळालीकर, योगेश चौधरी, दिनेश शहापूरकर, रामनाथ गर्जे, संजय भिंगारदिवे आदी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संजय सपकाळ म्हणाले की, नवरात्र हा भक्ती व शक्तिपूजेचा उत्सव आहे. केडगाव देवीचे मंदिर हे गावाचे आध्यात्मिक केंद्र आहे. येथे येणाऱ्या भाविकांना स्वच्छ वातावरण मिळणे ही सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छतेमुळे भक्ती अधिक पवित्र होते आणि श्रद्धेला बळ मिळते. या उपक्रमातून भाविकांना देखील निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. समाजाने राजकारण व वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून सामूहिकपणे स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.
या अभियानामुळे नवरात्रोत्सवात दर्शनास येणाऱ्या भक्तांना स्वच्छ आणि आनंददायी वातावरण मिळाले होते. भाविक व ग्रामस्थांनी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
