तायक्वांदो, वुशू व बॉक्सिंगमध्ये पदकांची कमाई
खेळाडूंची विभागीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका अंतर्गत झालेल्या शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सरस्वती प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून सुवर्णपदकासह पदकांची लयलूट केली. शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तायक्वांदो, वुशू आणि बॉक्सिंगमध्ये चमकदार कामगिरी केली.
यामध्ये तायक्वांदो स्पर्धेत कु. प्रांजल पोटे (अंडर-14) व चि. श्रीनिवास शिंदे (अंडर-17) यांनी सुवर्णपदक आणि चि. यश मांढरे (अंडर-17) व चि. संघराज तिखुटे (अंडर-17) कांस्यपदक पटकाविले.
वुशू मध्ये चि. श्रीनिवास शिंदे (अंडर-17) कांस्यपदक तर बॉक्सिंगमध्ये कु. जुबेर पठाण (अंडर-17) यांनी सुवर्णपदक मिळवले. यापैकी सुवर्णपदक विजेत्यांची आगामी विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर व क्रीडाशिक्षक अविनाश साठे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद व पालकांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
