फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी (दि.11 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात 17 वर्षा आतील मुलींमध्ये आठरे पाटील व कर्नल परब स्कूलने विजय मिळवला. तर 12 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूल, प्रवरा पब्लिक स्कूल व आठरे पाटील स्कूलने विजय संपादन केले. तर 14 वर्ष वयोगटात (मुले) सेक्रेटहार्ड कॉन्व्हेंट, प्रवरा पब्लिक स्कूल व द आयकॉन स्कूलचा संघ विजेता ठरला. या स्पर्धेत गुणांची कमाई करुन विविध मुला-मुलींच्या गटातून प्रवरा पब्लिक स्कूल, आर्मी स्कूल, आठरे पाटील स्कूल, आयकॉन स्कूल व ज्ञानसंपदा स्कूलने आघाडी घेतली आहे.
सकाळच्या सत्रात 17 वर्षा आतील मुलींमध्ये आठरे पाटील स्कूल विरुध्द आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात आठरे पाटील संघाला वेदिका ससे व निलम पवार यांनी प्रत्येकी 1 गोल करुन 2-0 गोलने विजय मिळवून दिला.
कर्नल परब विरुध्द डॉन बॉस्को यांच्यात झालेल्या सामन्यात 2-0 गोलने कर्नल परबने विजय मिळवला. यामध्ये माही बहुरुपी व हिरन्या गरुड यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
12 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द कर्नल परब स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात संकल्प जाधव याने 2 गोल करुन आर्मी पब्लिक स्कूलला 2-0 ने विजय मिळवून दिला.
दुपारच्या सत्रात 14 वर्ष वयोगटात (मुले) सेक्रेटहार्ड कॉन्व्हेंट स्कूल विरुध्द डॉन बॉस्को यांच्यात झालेल्या सामन्यात सेक्रेटहार्ड कॉन्व्हेंट स्कूलने 1-0 गोलने विजय मिळवला. यामध्ये हर्षद सोनावणे याने 1 गोल केले.
प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूलच्या संघाने आक्रमक खेळ करुन तब्बल 9 गोल केले. तर प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही. 9-0 गोलने प्रवरा पब्लिक स्कूलच्या संघाने एकहाती विजय मिळवला. यामध्ये मोहित चौधरी व रामचंद्र पालवे याने 2, अभिनव राऊत याने 4 व धीरज चारस्कर याने 1 गोल केला.
12 वर्ष वयोगटात (मुले) प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द ऑक्झिलियम काँन्व्हेंट स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूलने 5-0 गोलने विजय संपादन केले. जयवर्धन मानेदेशमुख व संग्राम चौधरी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. युवराज आहेर याने 2 व राजवर्धन दारकुंडे याने ओन गोल केला.
आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुध्द तक्षीला स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात आठरे पाटील स्कूलने 4-0 गोलने विजय मिळवला. सात्विक कर्पे व विश्वजीत आकाडे याने प्रत्येकी 1 गोल केला. वेदांत ससे यांनी 2 गोल केले.
14 वर्ष वयोगटात (मुले) कैसर एज्युकेशन स्कूल विरुध्द द आयकॉन स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात द आयकॉन स्कूलने 3-0 गोलने विजय मिळवला. यामध्ये मयंक बजाज, इशान गरड व श्रेयश बांगर यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
गुणांवर आघाडी घेतलेले संघ पुढीलप्रमाणे
17 वर्षे मुली अ गट श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल 7 गुण, प्रवरा पब्लिक स्कूल 5 गुण
17 वर्षे मुली ब गट आठरे पाटील पब्लिक स्कूल 12 गुण, पोदार इंटरनॅशनल स्कूल 6 गुण
16 वर्षे मुले अ गट प्रवरा पब्लिक स्कूल 4 गुण, श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल 2 गुण
16 वर्षे मुले ब गट आठरे पाटील पब्लिक स्कूल 4 गुण, तक्षिला स्कूल 2 गुण
16 वर्षे मुले क गट ज्ञानसंपदा स्कूल 3 गुण, आर्मी पब्लिक स्कूल 3 गुण
16 वर्षे मुले ड गट सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट 4 गुण, द आयकॉन पब्लिक स्कूल 4 गुण
14 वर्षे मुले अ गट प्रवरा पब्लिक स्कूल 6 गुण, श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल 6 गुण
14 वर्षे मुले ब गट आठरे पाटील पब्लिक स्कूल 6 गुण, ऑर्चिड्स इंटरनॅशनल स्कूल 6 गुण
14 वर्षे मुले क गट आर्मी पब्लिक स्कूल 9 गुण, अशोकभाऊ फिरोदिया स्कूल 3 गुण
14 वर्षे मुले ड गट सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट 6 गुण, द आयकॉन पब्लिक स्कूल 6 गुण
12 वर्षे मुले अ गट प्रवरा पब्लिक स्कूल 12 गुण, ऑक्सिलीयम कॉन्व्हेंट 6 गुण
12 वर्षे मुले ब गट आठरे पाटील पब्लिक स्कूल 12 गुण, आर्मी पब्लिक स्कूल 6 गुण
