• Tue. Jul 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

जांभळी-जांभुळबन येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

ByMirror

Aug 12, 2025
सांस्कृतिक कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन

शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन शालेय साहित्याचे वाटप


सांस्कृतिक कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन


आदिवासी समाज हा आपल्या देशाच्या इतिहासाचा, परंपरेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य घटक -रामदास बाचकर

नगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, उमेद सोशल फाऊंडेशन व ग्रामपंचायत जांभळी-जांभुळबन यांच्या संयुक्त विद्यमाने जांभळी (ता. राहुरी) येथील संभाचीवाडी येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध उपक्रम, शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम व शालेय साहित्याचे वाटप अशा उपक्रमांनी हा सोहळा रंगला होता.


जांभळी-जांभुळबन हे आदिवासी बहुल गाव असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व होते. स्थानिक आदिवासी कलाकारांनी पारंपरिक नृत्य, लोकगीतं आणि सांस्कृतिक कलांचे सादरीकरण करून वातावरण भारावून टाकले. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचा समृद्ध वारसेचा जागर करण्यात आला.


उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामदास बाचकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. प्रमुख उपस्थितीत फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, सचिव सचिन साळवी, खजिनदार संजय निर्मळ, सल्लागार दीपक धीवर, सदस्य रवी साखरे, विजय लोंढे, उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिऱ्हे, काकासाहेब म्हस्के हॉस्पिटलचे डॉ. यश चौधरी, जनकल्याण बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद साळवे आदी मान्यवरांचा समावेश होता.


रामदास बाचकर म्हणाले की, आदिवासी समाज हा आपल्या देशाच्या इतिहासाचा, परंपरेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य घटक. त्यांच्या जीवनपद्धतीत निसर्गाशी सुसंवाद, परस्पर सन्मान आणि श्रमाची प्रतिष्ठा आहे. आजच्या पिढीने आदिवासी समाजाच्या या गुणांपासून प्रेरणा घ्यावी. जांभळी-जांभुळबनसारख्या गावात असा सांस्कृतिक सोहळा आयोजित करणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


अनिल साळवे म्हणाले की, उमेद सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही केवळ सामाजिक उपक्रम राबवत नाही, तर समाजात शिक्षण, आरोग्य व संस्कृतीला चालना देण्याचे काम केले जात आहे. आदिवासी दिन साजरा करताना विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात शौकत शेख यांनी आदिवासी संस्कृतीचे महत्त्व स्पष्ट केले. कुणाल तनपुरे यांनी उमेद फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक उपक्रमाची कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी जांभळी गावच्या सरपंच आस्मा शेख, माजी सरपंच शकुंतला बाचकर, उपसरपंच अशोक मधे, सदस्य सुनील मधे, कुशाबा भुतांबरे, भिका मधे, मोतीराम मधे, बाळु काळे, लक्ष्मण मधे, पुनाजी मधे, साहेबराव पारधे, राजू मधे, नामदेव आघान, हरि भुतांबरे, नवनाथ पारधे, निवृत्ती जाधव, विठ्ठल पारधे, हरि पारधे, बबन पारधे, रामभाऊ पारधे, सुभाष काळे, बाळु केदार, संजय मधे, कुशाबा केदार, लक्ष्मण भले, मोरा अघान, आवजी मधे, दत्तु मधे, रंगनाथ मधे, सोनाजी मधे, भारत मधे, जानार्धन मधे, रविंद्र काळे, केशव भले, वसंत जाधव, मुनीर शेख, छबुराव जाधव, छाया जाधव, कविता जाधव, मंगेश जाधव, राजु वारे, रामदास पवार, बाळु गिर्हे, भोजु पारधे, अमर मधे आदींसह विद्यार्थी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल शिंदे यांनी केले. आभार ग्रामपंचायत पंचायत अधिकारी शरद सानप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शिक्षक विकास दावभट, राजेंद्र निमसे, शिवाजी काळे, संतोष कोरडे, राजेश मुंडे, धोंडिभाऊ ठाणगे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, भाऊराव वीर, प्रविण कोंढावळे, प्रियंका खिंडारे मेरा युवा भारत चे जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष, रमेश गाडगे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर तसेच जय युवा असोसिएशनचे ॲड. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *