• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

डायबेटीसवर मात करत 100 किमी सलग धावले; हरिभाऊ घोडके यांचा विक्रम

ByMirror

Aug 8, 2025
घोडके यांचा शहरात सन्मान

घोडके यांचा शहरात सन्मान


प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

नगर (प्रतिनिधी)- वेग माझं शस्त्र, ध्येय माझं लक्ष्य आणि धावणं हीच माझी ओळख आहे! या प्रेरणादायी विचारांची प्रचिती देणारे राजेंद्र उर्फ हरिभाऊ सूर्यभान घोडके यांचा एक आगळा-वेगळा सन्मान सोहळा नुकताच नगरमध्ये पार पडला. डायबेटीससारख्या आजाराला हरवत, त्यांनी एक नवा धावपटू म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.


तीन वर्षांपूर्वी डायबेटीसचे निदान झाल्यानंतर राजेंद्र घोडके यांनी घाबरण्याऐवजी एक नवा निर्णय घेतला डायबेटीसवर मात करायची. त्यासाठी त्यांनी धावण्याची वाट निवडली. नियमित व्यायाम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी रनिंगला आपले जीवन बनवले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे (दगडूशेठ गणपती) ते बारामती अशी 100 किलोमीटरची धाव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीत घोडके यांनी केवळ सहभाग घेतला नाही, तर 15 तास 9 मिनिटांत हे अवघड अंतर पूर्ण करून एक अनोखा विक्रम केला.


राजेंद्र घोडके यांचे पुढील लक्ष्य खडकवासला येथील 100 किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करणे आहे. त्यानंतर राजस्थानमधील जैसलमेर येथे 160 किलोमीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.
या गौरव सोहळ्याचे अध्यक्ष मोहनशेठ मानधना होते. त्यांनी भाषणात सांगितले, राजेंद्र घोडके या नगरच्या सुपुत्राने जो विक्रम केला आहे, तो अभिमानास्पद आहे. हा सत्कार म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला व जिद्दीला सलाम आहे. एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची, त्यागाची आणि योगदानाची समाजाकडून मिळणारी मान्यता ही केवळ औपचारिकतेपुरते नसून, त्यामागे एक भावनात्मक ओलावा असतो. घोडके यांनी केलेले काम, त्यांची मेहनत, त्यांची जिद्द या साऱ्याचं हे सार्वजनिक रूपानं केलेलं कौतुक असल्याचे ते म्हणाले.


या कार्यक्रमाप्रसंगी किशोर मुनोत, नरेंद्रजी फिरोदिया, कॅप्टन श्रीराम कदम, रामदास झेंडे (रयत सेवक बँकेचे उपाध्यक्ष), अशोक झरेकर, अनुप संकलेचा (रणजी पटू), मनोज कोतकर (सभापती), माजी नगरसेवक संभाजी पवार, रनिंग कोच योगेश सानप, अजित शेठ बोरा, लाभेश मुथा, पप्पू, सुबोध बोथरा, श्रेयांश कांकरिया, प्रीतम पोखरणा, अतुल शेटिया, प्रकाश चंगेडिया, अंकुश गायके, संदीप भोर सर, सुनील सातपुते, विठ्ठल महाराज कोतकर, सचिन पोखरणा, राजू भंडारी, जगदीप मकर, दिनेश भाटिया, भास्कर कराळे, दीपक तागडे, घोसपुरी उपसरपंच संतोष खोबरे, चिखलीचे माजी सरपंच मच्छिंद्र झेंडे आदी मान्यवरांसह बायजाबाई ग्रुप केडगाव, ए.एस. फिटनेस वाडिया पार्क, तिरंगा फाउंडेशन, ए.आर.सी. ग्रुप, कट्टाचे सर्व सदस्य उपस्थित होते. आभार संदीप भोर यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *