पुणे येथील बालेवाडीत रंगणार निवड चाचणी
नगर (प्रतिनिधी)- राज्य जलतरण स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्हा संघाची निवड चाचणीसाठी जिल्ह्यातील 80 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल येथे 19 ते 21 जुलै दरम्यान होणाऱ्या ज्युनिअर गटाच्या राज्य जलतरण स्पर्धेत सदर खेळाडू उतरणार आहे.
लोणी येथे नुकतेच झालेल्या स्पर्धेतून जिल्हा संघाची निवड संघटनेचे सचिव रावसाहेब बाबर यांनी जाहीर केली आहे. या संघासाठी मार्गदर्शक म्हणून सर्वेश देशमुख, व्यवस्थापक म्हणून अकिल शेख व योगिता तनपुरे हे काम पाहणार आहेत. तर राष्ट्रीय खेळाडू अमरितसिंग राजपूत हा संघाचे नेतृत्व करणार आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंसाठी कराळे क्लब हाऊसचे संचालक करण कराळे यांनी खेळाडूंना टी-शर्ट दिले आहेत. निवड चाचणीसाठी जाणाऱ्या खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विश्वजीत चव्हाण व अभिजीत चव्हाण यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.