• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहात; शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

ByMirror

Jul 14, 2025
पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहात; शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय गुणवत्तेत राज्यात आघाडीवर -दादाभाऊ कळमकर

नगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय गुणवत्तेच्या बाबतीत राज्यात आघाडीवर आहे. संस्थेने देखील गुणवंत शाळांना नेहमीच पाठबळ देण्याचे कार्य केले आहे. रयतमध्ये शैक्षणिक गुणवत्तेशी कधीही तडजोड केली जात नाही. कर्मवीर अण्णांच्या त्यागाची प्रेरणा घेऊन सर्वसामान्य वर्गातील मुलांचे भविष्य घडविण्याचे कार्य सुरु आहे.

संस्थेने एआय चा शैक्षणिक कामात समाविष्ट केला असून, सर्व शाळा अद्यावत आणि डिजीटल करण्याचे काम सुरु असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांनी केले.


शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहात पार पडली. या सभेत विविध शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी कळमकर बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उत्तर विभागाचे निरीक्षक नवनाथ बोडखे, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, कैलास गुंजाळ, कैलास मोहिते, विष्णूपंत म्हस्के, शामराव व्यवहारे, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके आदींसह शालेय शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत व रयत गीत सादर करण्यात आले. लक्ष्मीबाई व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करुन सभेला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकात मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह विद्यार्थ्यांचा आहार, आरोग्य, शारीरिक व मानसिक विकास याकडे देखील लक्ष दिले जात असल्याचे स्पष्ट करुन विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी पालक-शिक्षकांमधील संवाद महत्त्वाचा असून, यासाठी पालक शिक्षक संघ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सभेत माता-पालक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.


नवनाथ बोडखे म्हणाले की, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे सर्वाधिक विद्यार्थी जिल्हा व राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकत असून, विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिध्द केली आहे. बदलत्या शैक्षणिक धोरणाचा स्विकार करुन व काळाची गरज ओळखून संस्थेत अद्यावत शिक्षणाचे धोरण स्विकारण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, शिक्षण हा सामाजिक विषय असून, शिक्षणातून समाज घडणार आहे. पालक व शिक्षकांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचा विकास साधला जाणार आहे. मुलांची बौद्धिक क्षमता वाढलेली असून, त्या दृष्टीकोनाने अद्यावत शिक्षणाची त्यांना गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


उपस्थित पालकांनी पालक सभेत विविश सूचना मांडल्या. शाळेच्या वतीने पालकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिक्षिका मिनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, शितल रोहोकले, जयश्री खांदोडे, सोनाली अनभुले, रुपाली वाबळे, इंदूमती दरेकर, पुनम घाडगे, भाग्यश्री लोंढे, भारती सुसरे, कांचन मदने, विद्या बडवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पालवे यांनी केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *