• Sun. Jul 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

उद्योजक प्रविण केसकर यांना संत तुकाराम महाराज युवा उद्योजक पुरस्कार जाहीर

ByMirror

Jul 4, 2025
केसकर यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कार्याची दखल

केसकर यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कार्याची दखल

नगर (प्रतिनिधी)- किन्ही (ता. पारनेर) येथील उद्योजक प्रविण केसकर यांना स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


निमगाव वाघा (ता. नगर) येथे आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त रविवारी (दि.6 जुलै) होणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात केसकर यांना खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, साहित्यिक तथा प्राचार्या गुंफाताई कोकाटे, नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


प्रविण केसकर यांनी ग्रामीण भागातून येऊन पुणे येथील औद्योगिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन आपले नाव कमावले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून येऊन जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी औद्योगिक विश्‍वात आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन केसकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल केसकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *