• Tue. Jul 1st, 2025

निमगाव वाघात श्री क्षेत्र दैठणे गुंजाळच्या खंडेश्‍वर दिंडीचे स्वागत

ByMirror

Jun 28, 2025

ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष व टाळ मृदंगाचा गजर

नगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र दैठणे गुंजाळ येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री खंडेश्‍वर दिंडीचे निमगाव वाघा (ता. नगर) येथे येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व निमगाव वाघा ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. दिंडीने गावात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजराच्या भक्तीमय वातावरणात निर्माण झाले होते.


डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिंडीतील वीणेकरी ह.भ.प. बबन गुंजाळ यांचा सत्कार केला. तर दिंडीतील वारकऱ्यांना वारीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नामदेव फलके, भागचंद जाधव, दिंडी चालक बापूसाहेब गुंजाळ, ह.भ.प. हरीभाऊ महाराज येवले, माजी सरपंच साहेबराव बोडखे, अंशाबापू फलके, कोंडीभाऊ फलके, बापू फलके, मेजर सुनिल गुंजाळ, भाऊसाहेब जाधव, संतोष फलके, रोहिदास पादीर, शिवाजी पवार, नाना फलके, तुकाराम फलके, दत्ता ठाणगे, दिपक बोडखे, किरण शिंदे, राजू पवार, संदीप डोंगरे, सिताराम येवले, रविंद्र फलके, आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडीतील वारकऱ्यांना गावात अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या दिंडी सोहळ्यात दैठणे गुंजाळ, हिवरे बाजार, वडगाव आमली, पिंपळगाव कौडा, जखणगाव, सारोळा अडवाई या पंचक्रोशीतील वारकरी सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *