युवा मल्लांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगाव येथे बुधवार (दि.4 जून) पासून प्रारंभ झालेल्या देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील कुस्तीपटू दाखल झाले आहेत. सकाळी कुस्तीपटूंचे वजन घेण्यात आले.
शेवगावच्या खंडोबानगर मैदानावर स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून, संध्याकाळी स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा या स्पर्धेचे आयोजक अरुण मुंढे व जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे उत्तमपणे नियोजन करण्यात आले आहे. निमंत्रित कुस्त्यांबरोबर 42, 48, 52, 55, 60, 65, 74, 84 किलो आणि 84 ते 125 किलो ओपन गटात कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. कुस्त्यांसाठी दोन मातीचे आखाडे तयार करण्यात आले आहे.