• Sat. Jul 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

पोपटराव (नाना) साठे छत्रपती संभाजी महाराज समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

ByMirror

Jun 3, 2025
खासदार निलेश लंके यांच्याकडून सामाजिक कार्याचे कौतुक

खासदार निलेश लंके यांच्याकडून सामाजिक कार्याचे कौतुक

नगर (प्रतिनिधी)- सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी पोपटराव (नाना) धोंडीबा साठे यांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात खासदार निलेश लंके यांच्या हस्ते साठे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा सरोज आल्हाट, साहित्यिक भारत सातपुते, संमेलनाचे संयोजक व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, कवी संमेलनाचे अध्यक्ष रज्जाक शेख, बाळासाहेब देशमुख, ॲड. रामदास सुर्यवंधी आदी मान्यवर उपस्थित होते.


पोपटराव (नाना) साठे मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रीय योगदान देत आहे. धार्मिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य सुरु असून, उपेक्षीत घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ते विशेष कार्य करत आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. खासदार लंके यांनी साठे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *