• Sat. Jul 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

नाथाभाऊ आल्हाट यांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव

ByMirror

Jun 2, 2025
सन्मान सोहळ्यातून आंबेडकरी विचारांचा जागर

समाजहितासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा समाजातील सकारात्मकतेचा प्रतीक -खासदार निलेश लंके


सन्मान सोहळ्यातून आंबेडकरी विचारांचा जागर

नगर (प्रतिनिधी)- एसआरपी टायगर मोमेंट व आझाद समाज पार्टी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट यांनी केलेल्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. खासदार निलेश लंके व आमदार शिवाजी कर्डिले यांनी आल्हाट यांच्या सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देवून त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.


समाजहितासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा समाजातील सकारात्मकतेचा प्रतीक असल्याची भावना खासदार लंके यांनी व्यक्त केली. शेंडी बायपास (ता. नगर) येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या सन्मान सोहळ्यात केंद्रीय रेल्वे मंत्रालय प्रमुख सल्लागार सदस्य डॉ. आदित्य पतकराव यांच्या हस्ते आल्हाट यांचा सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकांचे वितरण करून उपस्थितांना आंबेडकरी विचारसरणीची ओळख करून देण्यात आली. विचारसंपन्न समाजाची उभारणी हाच खरा सामाजिक प्रगतीचा मार्ग आहे, हा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. यावेळी भीमशक्ती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भाऊसाहेब साठे, आझाद समाज पार्टी भीम आर्मीचे महाराष्ट्र युवा अध्यक्ष वैभव चाबुकस्वार, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष सुरेश बनसोडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सुमित गायकवाड, प्रवीण वाकडे, भीमशक्ती संघटनेचे सुदाम सरोदे, किरण शिंदे, नंदू वाकडे, तालुकाध्यक्ष भागचंद सोनवणे, संदीप भिंगारदिवे, भारत मनतोडे, शेवगाव तालुका अध्यक्ष संदीप पगारे, नेवासा तालुकाध्यक्ष प्रवीण साळवे, आष्टी तालुकाध्यक्ष दीपक गुरु, दीपक शिंदे, नवनाथ शिंदे, हुसेन सय्यद, नारायण शिंदे, भाऊसाहेब आल्हाट, सुरेश वारुळे, भाऊसाहेब ठोंबे, करमाळा तालुका अध्यक्ष अभिमन्यू डाळिंबे आदी उपस्थित होते.


डॉ. आदित्य पतकराव म्हणाले की, नाथाभाऊ आल्हाट यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे समाजात दीपस्तंभासारखी असतात. ते केवळ सामाजिक न्यायाबरोबर हजारोंना एक नवा विचार, नवा दृष्टिकोन देतात. आंबेडकरी विचारसरणीचा प्रसार, सामाजिक समता आणि दलित, शोषित, वंचित घटकांसाठी सातत्याने झगडणे हे त्यांचे ध्येय आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरफ यांचा वारसा जपणे, त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. आजचा सत्कार हा केवळ नाथाभाऊ आल्हाट यांचा गौरव नाही, तर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले.


सत्काराला उत्तर देताना नाथाभाऊ आल्हाट यांनी शोषित समाजाला आधार देण्यासाठी सर्व युवकांना संघटित करुन सामाजिक कार्य सुरु आहे. शोषित व वंचितांची सामाजिक प्रश्‍न सुटावी हे विचार आणि ध्येय घेऊन सामाजिक कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *