दहावी बोर्डात भाऊसाहेबच्या 61 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण तर रूपीबाई मोतीलालजी बोराच्या 113 विद्यार्थ्यांना 70 टक्के पेक्षा अधिक गुण
विद्यार्थ्यांनी ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावे -अशोक मुथा
नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (एस.एस.सी.) व बारावी (एचएससी) बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या दोन्ही शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
भाऊसाहेब फिरोदिया मधील इयत्ता दहावी बोर्डाचा 100% निकाल लागाल. यामध्ये 61 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवले. तर गणित आणि संस्कृतमध्ये प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले आहे. तसेच रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल 99.3% निकाल लागला. 113 विद्यार्थ्यांनी 70 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवले. इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 100%, तर कला शाखेचा 88% निकाल लागला आहे.
भाऊसाहेब फिरोदिया शाळेत झालेल्या गुणगौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खजिनदार प्रकाश गांधी, सल्लागार समितीचे सदस्य भूषण भंडारी, भाऊसाहेब फिरोदियाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, रूपीबाई बोराचे मुख्याध्यापक अजय बारगळ आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोक मुथा म्हणाले की, शिक्षणातून विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडणार आहे. विद्यार्थ्यांनी ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांच्या यशात शाळेतील गुरुजनांचा व पाठबळ देणाऱ्या आई-वडिलांचा मोठा वाटा असून, त्यांचा मान-सन्मान राखावा. मोठे झाल्यावर त्यांना कधीही विसरू नये, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी सरस्वती पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात सचिन पवार यांनी दोन्ही शाळेतील वाढता गुणवत्तेचा आलेख सादर केला. विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या नावांची घोषणा समृद्धी बिबवे यांनी केली. या गौरव सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते भाऊसाहेब फिरोदिया मधील इयत्ता दहावी आणि रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावी आणि बारावी बोर्डातील गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाहक गौरव फिरोदिया, विश्वस्त ॲड. किशोर देशपांडे, ॲड. गौरव मिरीकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी जोशी यांनी केले. आभार रवींद्र पंडित यांनी मानले.
गुणवत्ता यादीत चमकलेल्या पुढील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला:-
भाऊसाहेब फिरोदिया इयत्ता दहावी प्रथम- चैतन्य प्रकाश कार्ले (99%, गणित 100 पैकी 100), द्वितीय- ओंकार संतोष चेमटे, सुमेध ऋषीकेश मुजुमदार (98.20% संस्कृत 100 पैकी 100), तृतीय- धीरज दादाभाऊ भांड, अनुष्का संतोष पोळ (98%), चौथा- वरद संतोष दाणे (97.60%), पाचवा- यशोधन प्रद्युम्न सोनवणे (97.40%) आणि वेदांत गजानन गावंडे याने गणित तर श्रेयसी श्रीनिवास नागुल हिने संस्कृत मध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले.
रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल इयत्ता दहावी प्रथम- संचिता अशोक लांडगे (94.60%), द्वितीय- श्रध्दा शंकर बोरुडे (93.20%), तृतीय- मेघना चंद्रकांत अवधुत (92.80%), चौथी- स्नेहा विजय शिंदे (92.40%), पाचवी- ऋतू गणेश कळके (92%).
इयत्ता बारावी विज्ञान शाखा प्रथम- सिध्दी गौतम नहार (77.17%), द्वितीय- ऋतूजा शरद जाधव (65.83%), तृतीय- आशिष किरण गहिले (64.83%).
बारावी कला शाखा प्रथम- भाग्यश्री यशवंत थोरात (80.33%), द्वितीय- वामन उत्तम निंबाळकर (75.83%), तृतीय- यश राहुल टिळेकर (67.83%)