• Mon. Jul 21st, 2025

13 वर्षाखालील फुटबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ रवाना

ByMirror

May 24, 2025

रविवारी नांदेड जिल्ह्याबरोबर सलामीचा सामना

नगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनद्वारे आयोजित करण्यात आलेल्या सबज्युनिअर आंतर जिल्हा राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2024-25 साठी 13 वर्षा खालील अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ शिरपूर जि. धुळे येथे रवाना झाला. अहिल्यानगर जिल्हा संघाचा सलामीचा सामना नांदेड जिल्हा संघाबरोबर रविवारी (दि. 25 मे) होणार आहे.


अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेमार्फत 21 एप्रिल पासून सुरु असलेल्या जिल्हा संघ निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिरामधून या स्पर्धेसाठी 18 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. निवड समिती सदस्य म्हणून खालिद सय्यद व राजू पाटोळे यांनी काम पाहिले. संघ प्रशिक्षक म्हणून अभिषेक सोनवणे व रोहन कुकरेजा हे जबाबदारी पाहणार आहेत.
निवड झालेल्या खेळाडूंना जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, खालिद सय्यद, अमरजितसिंग शाही, जोगासिंग मिन्हास, सचिव रौनप फर्नांडिस, सहसचिव व्हिक्टर जोसेफ, प्रदीप जाधव, खजिनदार रिशपालसिंग परमार, राजू पाटोळे, जेव्हिअर स्वामी व इतर सर्व सभासदांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


अहिल्यानगर जिल्ह्याचा संघातील खेळाडूंचा समावेश पुढीलप्रमाणे:-
सम्राट राजकुमार आव्हाड (कर्णधार), मोहित रवींद्र चौधरी, तनिश संतोष पडागळे, शौर्य संजय मोरे, हर्षद संदीप सोनावणे, देवांश गणेश झरेकर, शौर्य महेश चंगेडिया, अर्हम प्रीतम गुगळे, अलोक प्रकाश कनोजिया, अथर्व अमित तोडमल, प्रथमेश प्रमोद लहाडे, स्वराज शिवाजी जाधव, आर्यन अनिल बोर्डे, प्रज्वल विजय ढोकळे, साईराज संतोष कबाडी, आयुष महेंद्र गाडळकर, राजवीर श्‍याम भूमकर, विराज सचिन दिघे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *