• Sat. Sep 20th, 2025

देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेसाठी कै. छबु लांडगे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा

ByMirror

May 19, 2025

आयोजकांकडे सुपूर्द


शेवगावला स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

नगर (प्रतिनिधी)- शेवगावमध्ये होणाऱ्या देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा 2025 साठी विजेत्या मल्लास देण्यात येणारी मानाची चांदीची गदा कै. छबु पैलवान लांडगे यांच्या स्मरणार्थ अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने देण्यात आली. ही स्पर्धा अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 28 व 29 मे रोजी खंडोबानगर, शेवगाव येथील मैदानावर होणार आहे.


या स्पर्धेच्या तयारीचा अंतिम टप्प्यात असून, सोमवारी (दि.19 मे) चांदीची गदा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व स्पर्धेचे आयोजक अरुण मुंढे यांच्याकडे जिल्हा तालिम संघाचे नगर शहराध्यक्ष पै. नामदेव लंगोटे व पै. श्‍यामभाऊ लोंढे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली. यावेळी गदेचे पूजनही करण्यात आले. यावेळी चांदीच्या गदेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अरुण पाटील लांडे, विजयराव देशमुख, फुलचंद अण्णा रोकडे, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, किरण कोतकर, नंदू मुंडे, बाळासाहेब कोळगे, विलास फाटके, कडू मगर, बाळासाहेब डोके, सालारभाई शेख, भाऊ वाघमारे, अजिनाथ मासाळकर, कानिफ साखरे, अनिकेत ढाकणे, नगरसेवक अंकुश कुसळकर, अजय भापकर, कमलेश गांधी, बाळासाहेब खटोड, सरपंच पप्पू केदार, राजू तिवारी, जयकिसान बलदवा, उदय मुंडे, विनायक खेडकर, मच्छू कोरडे, एकनाथ कुसळकर, अमोल सागडे, राम कोळगे, सोमनाथ मोहिते, नाना देहडराव, रमेश जाधव, अभय पालवे, बाळासाहेब नजन, गोपी तिवारी, अमोल भोकरे, सोमनाथ लोखंडे, पै. छगन पानसरे, वाकडे सर आदी उपस्थित होते.


अरुण मुंढे यांनी यावेळी सांगितले की, पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर भव्य डोंब उभारण्यात येणार असून, मैदानाची तयारी, स्टेज, प्रेक्षक गॅलरी आदी कामे सुरू आहेत. यावेळी महाराष्ट्र केसरी मल्ल एकमेकांना भिडणार असून, विजेत्या मल्लासाठी भरीव बक्षीस ठेवण्यात आले आहे. मल्लांसाठी राहण्याची, जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण जिल्ह्यातील मल्लांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


स्पर्धेच्या ठिकाणी आयोजक व तालीम संघाचे पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून मांडव, प्रेक्षक गॅलरी, कुस्ती मैदान उभारणीबाबत सूचना केल्या. या स्पर्धेच्या नियोजनासाठी मोहन हिरणवाळे, सुनील भिंगारे, प्रताप चिंधे, विलास चव्हाण, पप्पू शिरसाठ, सुनील भिंगारे, ऋषिकेश धांडे, संदीप बारगुजे, बबलू धुमाळ, भागवत ठोंबरे, नाना कोतकर, विशाल नाकाडे, अनिल ढवण प्रयत्नशील आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या भव्य कुस्ती स्पर्धेकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *