सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत मिरवणुकीत एकतेचे दर्शन
नगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मढी (ता. पाथर्डी) येथे अत्यंत उत्साहात व धार्मिक एकात्मतेचा संदेश देत साजरी करण्यात आली. विविध धर्मीय समाजबांधवांनी भगवे, निळे व हिरवे ध्वज हातात घेऊन मिरवणुकीत सामील होत समाजात ऐक्याचा अनोखा संदेश दिला. गावातून काढण्यात आलेली भव्य मिरवणूक लक्षवेधी ठरली.
पाथर्डी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेना दलित आघाडीचे अध्यक्ष अंबादास आरोळे, ज्येष्ठ नेते नवनाथ चव्हाण, तालुका प्रमुख भगवान दराडे, नंदूभाऊ डाळिंबकर, अशोक पगारे, भाऊसाहेब आरोळे, फिरोज शेख, फारुक शेख, काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाणे, तसेच सतीश साळवे, आकाश शिंदे, सद्दाम शेख, अंतोन ससाणे, जॉन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
गावातून निघालेली मिरवणूक ही गावकरी, महिला, युवक-युवती यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विशेष आकर्षण ठरली. शांततेत पार पडलेल्या मिरवणुकीमध्ये काँग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष नसीम शेख, भोरु म्हस्के, बाळासाहेब शिंदे, अजित शिंदे, रवी ससाणे, विलास नरोटे, तोहकीक शेख, रोहित पुंड, संदेश शिंदे, आस्तान चव्हाण, शैला चव्हाण, सारिका चव्हाण, सीमा चव्हाण, वाळबाई काळे सहभागी झाले होते. मिरवणुकीतून मढी गावातील नागरिकांनी सामाजिक सलोखा, बंधुतेचे दर्शन घडविले.