सांस्कृतिक कार्यक्रमाने चिमुकल्यांनी जिंकली मने
नगर (प्रतिनिधी)- शहरातील सनशाइन प्री-स्कूल व क्लासेसचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनात बालकलाकारांनी आपल्या अदाकारीने व सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. मुलांनी विविध गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली. बालकांच्या या कलागुणांना उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
![](https://mirrornews24.in/wp-content/uploads/2025/02/MIR_2018.jpeg)
मुकुंदनगर येथील एन.एम. गार्डन मध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून मनपा स्थायी समितीच्या माजी सभापती नसीम खान उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी हुरैन मुनव्वर हुसैन यांनी कुरान पठण केले. सनशाईन प्री-स्कूलचे संचालक जमजम खान यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन पालकांचे स्वागत केले.
नसीम खान म्हणाल्या की, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत मुलांमध्ये संस्काराची रुजवण करुन त्यांच्या भविष्याचा पाया रचला जातो. मुलांचा बौध्दिक विकास लहानपणी झाल्यास भविष्यात ही मुले पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सनशाईनच्या मुख्याध्यापिका हिना खान यांनी वर्ष 2025-2026 या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक अहवाल सादर करुन मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी अहमदनगर उर्दू प्रायमरीच्या मुख्याध्यापिका रुमाना खान, शबनम बाजी, जमजम खान, अनम शम्स खान उपस्थित होत्या.
कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, मेडल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विविध गीतांद्वारे नृत्याचे सादरीकरण करुन विद्यार्थ्यांनी भारत देशातील विविध प्रांतातील संस्कृतीचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खन्सा खान यांनी केले. सनशाईन प्री-स्कूल व क्लासेसच्या उपमुख्यध्यापिका शबनम सय्यद यांनी आभार मानले. कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी हिना खान, रानाबतूल खान, शिफा बागवान, सनोबर खान, तहुरा शेख, रुबिना शेख, शायेमा खान, नाहिद खान आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.