• Wed. Dec 31st, 2025

हेलन पाटोळे यांना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान

ByMirror

Jan 15, 2025

तंटामुक्ती, गरजू मुलींचे लग्न लावणे, महिला सक्षमीकरण व शैक्षणिक मदतीच्या कार्याची दखल

नगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत असलेल्या शिक्षिका हेलन ॲलेक्स पाटोळे यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शहरात झालेल्या नवव्या सावित्री ज्योती महोत्सवात खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पाटोळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


सामाजिक कार्यामध्ये वाहून घेतलेल्या पाटोळे प्रसिध्दीपासून अलिप्त राहून आपले सामाजिक कार्य करत आहे. त्यांचे सामाजिक कार्याला उजाळा देण्यासाठी त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सुहासराव सोनवणे, डॉ. रमेश वाघमारे, स्वागत अध्यक्ष किशोर डागवाले, सिने कलाकार राजेंद्र गटणे, ॲड. शारदा लगड, लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात, रजनीताई ताठे, हर्षल आगळे, संयोजिका जयश्री शिंदे, मुख्य संयोजक ॲड. महेश शिंदे आदी उपस्थित होते.
हेलन पाटोळे यांनी तंटामुक्ती अभियानात सहभाग घेऊन अनेक वाद सामंजस्याने मिटवण्याचे कार्य केले आहे. गरीब गरजू मुलींच्या विवाहासाठी पदरमोड करून लग्न लावून देण्याचे काम त्या करत आहे. गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य साठी मदत करणे, बचत गटातील महिलांना लघुउद्योग करण्यासाठी मार्गदर्शन, शासनाच्या योजनेचा फायदा मिळवून देण्याचे कार्य त्या करत आहे. सध्या त्या डॉन बॉस्को हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन महोत्सव समितीने त्यांना पुरस्कार दिला आहे.


पाहुण्यांच्या हस्ते सेमी पैठणी साडी, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र त्यांना प्रदान करण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना पाटोळे यांनी आजपर्यंत केलेल्या समाजकार्याची पावती मिळाली असून, पुरस्कारामुळे आणखी कार्य करण्याची ऊर्जा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *