• Mon. Mar 2nd, 2026

सावेडीत 9 ते 12 जानेवारी दरम्यान सावित्री ज्योती महोत्सवाचे आयोजन

ByMirror

Dec 21, 2024

सावित्री ज्योती महोत्सव महिला सक्षमीकरणाची नांदी ठरणार -आ. संग्राम जगताप

बचत गटातील महिलांना सहभाग होण्याचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- जय युवा अकॅडमीच्या माध्यमातून सुरु असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. हे महोत्सव महिला सक्षमीकरणाची नांदी ठरत असून, सावित्री ज्योती महोत्सव नगरकरांसाठी नवीन वर्षात मोठी पर्वणी ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


दरवर्षीप्रमाणे सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात सावित्री ज्योती महोत्सवाचे 9 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण आमदार संग्राम जगताप यांना देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी संयोजन समितीचे ॲड. महेश शिंदे, सुहासराव सोनवणे, रावसाहेब काळे, दत्ता वामन, मेजर शिवाजी वेताळ, राजकुमार चिंतामणी, हमीदभाई शेख, मिया शेख, अरुण ढाकणे, प्रा. संजय पडोळे, बाळासाहेब पाटोळे, रजनी ताठे, आरती शिंदे, विद्या शिंदे आदीं उपस्थित होते.


आमदार जगताप शहर विधानसभेच्या मतदार संघात तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल त्यांचा सावित्री ज्योती महोत्सव संयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सुहासराव सोनवणे म्हणाले की, बचत गटातील महिलांसाठी नवनवीन व्यवसाय प्रशिक्षण, कच्चामाल, वाहतूक व्यवस्था, व्यवसायासाठी शासनाच्या विविध योजना, भांडवल, उद्योग उभारणी, बाजारपेठ आणि मार्केटिंगच्या ज्ञानासाठी हा महोत्सव उपयुक्त असल्याचे सांगितले.
दरवर्षीप्रमाणे महोत्सवात बचत गट स्टॉल, वस्तू विक्री प्रदर्शन, बचत गटांच्या उत्पादनांचे विविध स्टॉल, सर्व जातीय वधू-वर मेळावा, वीर पत्नींचा गौरव, मोफत आरोग्य शिबिर, लोककला सादरीकरण, युवक-युवतींसाठी विविध स्पर्धा, कवी संमेलन, व्याख्यान, ब्युटी टॅलेंट शो, लहान मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा चार दिवस मेजवाणी राहणार आहे. या महोत्सवात बचत गटातील महिलांना सहभागी होण्याचे आवाहन ॲड. महेश शिंदे यांनी केले.


अहमदनगर महानगरपालिका, जय स्वयंसेवी संस्था संघटन, जिल्हा क्रीडा कार्यालय, समाजकार्य महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, रयत प्रतिष्ठान, जय युवा अकॅडमी, उडान फाउंडेशन, समग्र परिवर्तन युवा बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून हा महोत्सव घेण्यात येणार आहे. महोत्सव संयोजनासाठी जयश्री शिंदे, मीना म्हसे, अश्‍विनी वाघ, दिनेश शिंदे, पोपट बनकर, गणेश बनकर, रावसाहेब मगर, सुनील मतकर, सागर अलचेट्टी, अनंत द्रविड, कल्याणी गाडळकर, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. पुष्पा जेजुरकर, मेजर भीमराव उल्हारे, ॲड. प्रशांत साळुंके प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *