• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

बाल चित्रकला स्पर्धेत सावित्रीबाई फुले इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

ByMirror

Nov 15, 2024
बाल चित्रकला स्पर्धेत सावित्रीबाई फुले इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

तीन विद्यार्थी चमकले जिल्हास्तरावर

नगर (प्रतिनिधी)- कला संचालनालय मुंबई महाराष्ट्र राज्य व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बालचित्रकला स्पर्धेत सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शाळेतील तीन विद्यार्थी जिल्हास्तरावर चमकले असून, या विद्यार्थ्यांचा जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
अशोकभाऊ फिरोदिया विद्यालयात नुकतेच बालचित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी दरेकर, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य प्रभाकर भाबड, जिल्हा माध्यमिक शिक्षण विस्तार अधिकारी पवार, थोरात, चित्रकार अशोक डोळसे, सचिन सांगळे आदी उपस्थित होते.
अशोक कडूस यांनी पालक आणि कलाशिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. कलेची आवड असलेल्या मुलांना प्रोत्साहन मिळाल्यास नक्कीच भविष्यातील कलाकार घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या स्पर्धेत सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आरोही भगवान देशमुख (तृतीय), अनन्या राजू भोसले (तृतीय) व तन्वी अरुण आमले (चतुर्थ) यांनी 9 ते 12 वर्ष वयोगटात (गट क्रमांक तीन) यश मिळवून शाळेचे नाव उंचावले आहे. त्यांना कलाशिक्षक हरेश्‍वर साळवे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळ संस्थेचे सभापती प्रमोद रसाळ, सचिव महानंद माने, खजिनदार महेश घाडगे, स्कूलच्या प्राचार्या योगिता आठरे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *