• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षिततेवर राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराला प्रतिसाद

ByMirror

Oct 30, 2024
विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षिततेवर राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराला प्रतिसाद

राज्यातील 65 हजार शाळांना मिळणार लाभ

36 जिल्ह्यासाठी 36 मास्टर ट्रेनर यांना मार्गदर्शन

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व स्किल ट्री लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनाने सुरक्षा आणि सुरक्षितता उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून राज्यातील 65 हजार शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षतितेच्या दृष्टीकोनाने मार्गदर्शन करण्यात येत आहे.


महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक आर. विमला मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी एक मास्टर ट्रेनर अशाप्रकारे 36 जिल्ह्यासाठी 36 मास्टर ट्रेनर यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण मुंबई येथे घेण्यात येत आहे. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर सर्व मास्टर ट्रेनर जिल्हा परिषदेतील शाळांना सुरक्षा आणि सुरक्षितता या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. याचा ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *