• Fri. Jul 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

एमआयडीसीच्या रेणुकामाता देवस्थान येथे रावण दहन

ByMirror

Oct 13, 2024
एमआयडीसीच्या रेणुकामाता देवस्थान येथे रावण दहन

हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती

आतषबाजीने उजळला परिसर

नगर (प्रतिनिधी)- विजयादशमीनिमित्त एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्टच्या वतीने पंचवीस फुटी रावणाचे दहन करण्यात आले. रावण दहनानंतर अर्धा तास चाललेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

रावण दहनाचा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी हजारोंच्या संख्येने देवस्थानच्या मैदानात गर्दी केली होती.
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, खजिनदार एकनाथ वाघ, सचिव दत्तात्रय विटेकर, विश्‍वस्त गोरख कातोरे, राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी उपस्थित होते.


रावण दहन करताच भाविकांनी बोलो सियाराम चंद्र की जय….चा एकच गजर केला. प्रारंभी मंदिरात रेणुकामातेची आरती करण्यात आली. पारंपारिक वाद्याच्या गजरात मंदिर परिसरातून मिरवणुक काढण्यात आली होती. या मध्ये देवस्थानचे सर्व विश्‍वस्त व भाविक सहभागी झाले होते.

मंदिरा समोरील मैदानात रावणाचे दहन करण्यात आले. रावण दहनानंतर भव्य स्वरुपाच्या आतषबाजीने संपूर्ण परिसरासह आसमंत लखलखाटून गेला होता. शिस्त व नियोजनबध्द कार्यक्रमांचा भाविकांनी मनमुराद आनंद लुटून विजयादशमीचा उत्सव साजरा केला. देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून नवरात्रोत्सव भव्य स्वरुपातील विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी पार पडला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *