• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी करुन स्वच्छता अभियान

ByMirror

Oct 4, 2024
महात्मा गांधीजी यांच्या विचाराने प्रत्येकाने स्वच्छतेसाठी योगदान द्यावे -ॲड. महेश शिंदे

सूर्या मॉर्निंग ग्रुप, जय युवा अकॅडमी व उत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

महात्मा गांधीजी यांच्या विचाराने प्रत्येकाने स्वच्छतेसाठी योगदान द्यावे -ॲड. महेश शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात माय भारत अतंर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रमाच्या माध्यमातून सूर्या मॉर्निंग ग्रुप, जय युवा अकॅडमी व उत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त वाडिया पार्क क्रीडा संकुल परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


प्रारंभी वाडिया पार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. ॲड. महेश शिंदे, राजकुमार चिंतामणी, संजय पडोळे, रवी वाघ, महेश पेंटा, विजय गांधी, अशोक चंगेडे, अविनाश काळे, नयना बनकर, रामेश्‍वर राऊत, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.
ॲड. महेश शिंदे म्हणाले की, महात्मा गांधीजी यांच्या विचाराने प्रत्येकाने स्वच्छतेसाठी योगदान दिले पाहिजे. स्वच्छता हीच खरी सेवा आहे. या सेवेतून स्वच्छ भारत घडणार आहे. शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी संकल्प करण्याचे त्यांनी आवाहन केले.


या उपक्रमातंर्गत उपस्थित नागरिकांना अस्वच्छतेमुळे पसरणारी रोगराईची माहिती देऊन स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले. हातात झाडू संस्थेचे प्रतिनिधी अभियानात सहभागी झाले होते. या स्वच्छता अभियानासाठी नेहरु युवा केंद्राचे राज्य संचालक शिवाजी खरात, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, विशाल गर्जे, सुनील धारुडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *